संजय राठोडांची विकेट पडल्यानंतर वनमंत्रिपद कुणाला? ‘या’ नावांची चर्चा

Sanjay Rathod

मुंबई : संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा (resigns) दिल्यानंतर वनमंत्री पदाचा कार्यभार कोणाला दिला जाणार? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मंत्रिपद मिळवण्यासाठी आमदारांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. वनमंत्री होण्याच्या शर्यतीत आता विदर्भ विरुद्ध मुंबई असा जणू सामनाच रंगणार असल्याचे चित्र आहे.

राठोड यांच्यानंतर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन विदर्भातील एखाद्या आमदाराला राज्यमंत्री पद दिली जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भातील गोपिकिशन बाजोरिया, नितीन देशमुख आणि संजय रायमुळकर या नावांचा विचार मंत्रिपदासाठी केला जाऊ शकतो.

संजय राठोड यांनी राजीनामा दिला, तर त्यांच्या मंत्रिपदाचा तात्पुरता कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील त्याच मंत्र्याकडे जाईल. मंत्रिमंडळ विस्तारात वनमंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्याचं नाव निश्चित करतील, त्यालाच वनमंत्री पदाची लॉटरी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER