ज्याला इंग्रज घाबरायचे,असा कोण होता उत्तर भारतातील ‘रॉबीन हूड’ डाकू सुल्ताना ?

Who was the 'Robin Hood' Daku Sultana from North India whom the British feared

आजपासून जवळपास १ शतकापूर्वी भारताच्या मुरादाबादमधल्या हरथला गावात एक मुलगा जन्माला आला. हा तोच काळ होता जेव्हा महात्मा गांधी (Mahatma Gandhi)बॅरिस्टर होण्यासाठी अभ्यास करत होते. पुढे जाऊन हा मुलगा उत्तरप्रदेशातला खतरनाक मोठा डाकू बनला. याचं नाव होतं सुल्ताना. याला सगळेजण सुलताना (Sultana) डाकू म्हणूनही ओळखायचे.

सुलताना असा डाकू होता ज्याने इंग्रजांना अनेकदा लुटलं. इतक्यावेळा लुटलं की अक्षरशः इंग्रजांच्या नाकी नऊ आणले.

सुल्ताना डाकूबद्दल उत्तरप्रदेशात अनेक लोकगीतं, गोष्टी आणि किस्से ऐकायला मिळतात. इंग्रजांच्या गुलामीत जगणाऱ्या भाराताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आहुती देणाऱ्या महान नायकांपैकीच सुल्ताना डाकू एक.

जे लोक भारताला लुटतात त्या लोकांना लुटण्यात काहीच गैर नाही असं सुल्ताना नेहमीच म्हणत असे. तो त्या नेत्यांपैकी नव्हता जे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करत होते. त्याला कधीही जननायक बनण्यात रस नव्हता. त्याला फक्त भारताला लुटणाऱ्या इंग्रजांना लुटायचं होतं.

सुल्ताना डाकूबद्दल लिखित माहिती फारच कमी असली तरीही असं म्हटलं जातं की २०व्या शतकातला तो सगळ्यात मोठा डाकू होता. गावागावात त्याची लोकप्रियताही खूप होती. महाराणा प्रताप यांच्या घोड्याच्या नावावरून त्याने आपल्या घोड्याचं नावही चेतक ठेवलं होतं.

असं म्हटलं जातं की सुल्ताना डाकूवर एक गोरी इंग्रज महिलाही फिदा झाली होती. ती त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करू लागली होती. त्याचं पुढे काय झालं याबद्दल मात्र माहिती उपलब्ध नाही.

असं म्हणतात की सुल्ताना वयाच्या १७ व्या वर्षांपासूनच डाकू बनला. भारतातलया लोकांवर होणारा अत्याचार आणि इंगरांकडून होणारी लूटमार या गोष्टी बघूनच सुल्ताना डाकू झाला. त्याने इंग्रजांना लुटायला सुरुवात केली. यामुळे त्याला हळूहळू गावागावातल्या लोकांचं स,अर्थान्ह मिळू लागलं. शोषित आणि पीडित लोकांसाठी सुल्ताना आशेचा किरण होता. हळूहळू लोकांचा विश्वास दृढ होत गेला आणि लोक त्याच्यासोबत येऊ लागले आणि वर्षभरातच त्याने १०० डाकूंची गॅंग बनवली. गरिबांनी मेहनतीनी कमावलेले पैसे इंग्रज लुटतायेत हे पाहून इंग्रजांचा खजाना सुल्तानाच्या पहिल्या निशाण्यावर होता.

उत्तरप्रदेशातील नजिदाबादच्या प्रदेशात सुल्तानाची दहशत होती. इंग्रजांसाठी इथला रस्ता अवघड बनला होता. आपल्या मृत्युचा साफळाच त्यांना हा रस्ता वाटत असे. सुल्ताना डाकू आणि गॅंगने इथल्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवायला सुरुवात केली होती. त्यांच्या निशाण्यावर इंग्रजांचा खजिना होता. नैनितालच्या राजनिवासाकडे जाणारा आणि प्रसिद्ध डेहरादूनकडे जाणारा रस्ता नाजिदाबादमधूनच जायचा. जेव्हा जेव्हा इंग्रज इथून जायचे सुल्तानाआणि त्याची गॅंग या सगळ्यांना लुटायचे.

सुलताना गावातल्या लोकांमध्ये प्रसिद्ध होता. इंग्रजांच्या मालाने भरलेल्या रेल्वेगाड्याही सुल्ताना लुटायचा. हे लुटलेलं समान तो गावातल्या लोकांमध्ये आणि गरीबांमध्ये वाटून टाकत असे.

श्रीमंतांना लुटून गरीबांमध्ये वाटणारा सुल्ताना गरिबांचा मसीहा झाला होता. पण इंग्रज सरकारच्या नाकी नऊ आणलेल्या सुल्तानाला पकडण्यासाठी इंग्रजांनी प्रयत्न सुरु केले होते. त्यांच्यासाठी तो मोठा अपराधी बनला होता. पण सुल्ताना इतक्या सहा हाती लागणाऱ्यातला नव्हता.

इंग्रजांनी ३०० जवानांची टीम बनवली ज्यांच्याकडे सुसज्जित हत्यारंही होती. ५० घोडेस्वारही या टीम मध्ये होते. पण प्रचंड मेहनत करूनही सुल्तानाला ते पकडू शकले नाहीत. यांनंतर युवा अधिकारी फ्रेडी यंग याला बोलावण्यात आलं आणि सुल्तानाला पकडण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली.

फ्रेडी यंग याने अनेकवेळा प्रयत्न करूनही सुलताना हाती लागत नव्हता तेव्हा इंग्रज सरकारने आयरिश मूळ असलेला लेखक आणि तरबेज शिकारी असणाऱ्या जेम्स जिम कार्बेट याला सुल्ताना डाकूला पकडण्याची जबाबदारी देण्यात आली. परंतु प्राण्यांची शिकार करण्याएवढं सोप्पं काम हे नव्हतं. जिम काहीही करू शकला नाही.

फ्रेडीची चौकशी आणि काम सुरूच होतं. तोही हार मानणारा अधिकारी नव्हता. शेवटी सुल्ताना डाकू फ्रेडीच्या हाती लागलाच. इंग्रज काळातले सिव्हिल सेवा अधिकारी आणि लेखक फिलिप मेसन यांनी त्यांच्या ‘द में हू रुल्ड इंडिया’ या पुस्तकात सुल्ताना डाकूला फ्रेडी यंग याच अधिकाऱ्याने पकडल्याचा उल्लेख केला आहे.

असं म्हणतात की अटक केल्यानंतर सुल्ताना डाकूची सुटका व्हावी म्हणूनही फ्रेडीने प्रयत्न केले पण तो यशस्वी होऊ शकला नाही. सुल्तानाला आपल्या मुलाला डाकू होऊ द्यायचं नव्हतं. आपल्या बापाच्या नावामुळे त्याला बदनामी झेलावी लागू नये असं सुल्तानाला वाटायचं. त्याने या इंग्रज अधिकाऱ्याला आपल्या मुलाकडे लक्ष देण्यास सांगितलं. असं म्हणतात की सुल्तानाच्या मुलाला फ्रेडीने शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवलं.

सुल्तानाला लूटमार आणि हत्येच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा इंग्रज सरकारने सुनावली आणि ७ जुलै १९२४ ला त्याच्या अन्य सहकाऱ्यांसोबत आग्र्याच्या तुरुंगात सुल्तानाला फाशी देण्यात आली. सुल्तानाला सहारा देणाऱ्या ४० कुटुंबांनाही काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुल्तानाच्या फाशीनंतर लोकांमध्ये प्रचंड हळहळ दिसून आली होती. फक्त एका डाकूची दहशत नाही तर गरिबांचा मसीहा या फाशीने संपला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER