कोण होते जस्टीस लोया ? आणि काय आहे त्यांचे मृत्य प्रकरण ?

Loya and Amit Shah

नागपूर: सध्या देशात जर सर्वात जास्त मिडिया कवरेज कुठल्या बातमीला मिळत असेल तर ते आहे जस्टीस लोया यांचे मृत्यू प्रकरण. जस्टीस लोया यांच्या मृत्य प्रकरणावरून वृत्त पत्रांमधून किमान दोन तरी बातम्या रोज प्रकाशित होतात. अशातच बऱ्याच जणांना कदाचित हे माहिती नसेल की हे प्रकरण इतके ताणण्या मागचे नेमके कारण काय ? यामागचे कारण आपण जाणून घेऊच पण आधी हे जाणून घेऊया की जस्टीस लोया नेमके कोण होते.

जस्टिस ब्रिजगोपाल लोया हे गुजरातमधल्या सोहराबुद्दीन बनावट एन्काऊन्टर प्रकरणात CBI कोर्टाचे न्यायाधीश होते. याच खटल्यात भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही आरोप असल्याने हा खटला राजकीयदृष्ट्याही संवेदनशील झाला होता.

नागपूरमध्ये एका लग्नसोहळ्याला गेलेले असताना लोया यांचा १ डिसेंबर २०१४ मध्ये संशयास्पद मृत्यू झाला. जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असे सांगण्यात येत आहे. लोया यांच्या मृत्यूनंतर सोहराबुद्दीन एन्काऊन्टर खटल्यातून अमित शाह यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

आता विरोधकांचा असा आरोप आहे की, न्यायाधीश लोया यांचा मृत्यू नैसर्गिक न्हवता, तर या मागे काही घातपात असल्याचा आरोप ते करीत आहे. सर्वोच्च न्ययालयाने नुकत्याच दिलेल्या निकाला नुसार लोया यांचा मृत्यू हा नैसर्गिक होता असे सांगितले आहे. व या प्रकरणाची चौकशी करण्यास नकार दिला आहे.