रोहित शर्माने आयपीएलची ट्राॕफी सर्वात आधी कुणाला दिली?

Rohit Sharma

मुंबईने (Mumbai) पाचव्यांदा आयपीएलची (IPL) ट्रॉफी जिंकली. रोहित शर्मा (Rohit Sharma) हासुध्दा पाचव्यांदा मुंबईचा विजेता कर्णधार बनला पण विजेतेपदाची ट्रॉफी स्विकारल्यावर त्याने सर्वात आधी कुणाला दिली? पारितोषिक समारंभात मुंबईच्या संपूर्ण संघासोबत ट्राॕफी उंचावताना जो खेळाडू दिसला तो तसा फार परिचयाचा नव्हता तर अनोळखी होता. अशा अनोळखी खेळाडूला मुंबई इंडियन्सने हा सन्मान का दिला आणि तो आहे तरी कोण?

तर हा खेळाडू आहे…प्रिन्स बलवंत राय! (Prince Balwant Rai) अवघ्या 21 वर्षांचा हा खेळाडू…या प्रिन्सला मुंबईकडून एकही सामना खेळायला मिळाला नाही..पण ट्रॉफी मात्र रोहितकडून सर्वात आधी त्याच्या हातात गेली कारण मुंबई इंडियन्सची परंपरा आहे …संघातील सर्वात तरुण व सर्वात नव्या खेळाडूला ट्रॉफी उंचावण्याचा सन्मान देण्याची…त्यानुसार प्रिन्स बलवंत रायला आयुष्यभर आठवणीत राहणारा हा मान मिळाला.

प्रिन्स हा पंजाबचा लेगस्पिनर. त्याला पंजाबसाठी एकही प्रथम श्रेणी वा मर्यादीत षटकांचा सामना खेळलेला नसताना मुंबईने करारबध्द केले. अजुनही तो पंजाबच्या सिनियर संघासाठी एकही सामना खेळलेला नाही पण आयपीएलची ट्रॉफी मात्र त्याने उंचावली आहे. त्याच्यासाठी यंदा मुंबईने 20 लाखांची किंमत मोजली. राहुल चाहरसाठी बॕकअप म्हणून त्याला मुंबईने घेतलेले आहे. संगरुर (पंजाबच्या) या खेळाडूला सामना भलेही एकसुध्दा खेळायला मिळाला नसेल पण रोहित शर्मा, जसप्रित बुमरा, ट्रेंट बोल्ट अशा दिग्गजांकडून त्याला भरपूर शिकायला मिळाले असणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER