पत्नीला नग्न परेड करायला लावणारा कोण होता सनकी सम्राट ‘कालिगुला’?

Caligula - Maharastra Today

एखाद्याच्या तोंडूनं बकरी हे नाव निघालं तर त्याला फाशी देणारा, स्वतःच्या पत्नीला मित्रांसमोर नग्न परेड करायला लावरणारा सनकी हुकुमशहाबद्दल तुम्ही ऐकलंय का? रोमन साम्राज्यात असाच एक क्रुर शासन होऊन गेला. ज्याच्या चित्र विचित्र करामतींची नोंद आजही इतिहासात आढळते.

रोमन सम्राट ‘कालिगुला’ असं या सनकी सम्राटाचं नाव… अत्यंत निर्दयी आणि तापट डोक्याचा राजा. त्याच्याशी संबंधी असे किस्से इतिहासात नोंदवलेत जे ऐकून तुम्ही अवाक व्हाल. याचे स्वतःच्या बहिणीशी अनैतिक संबंध होते. तो सुरुवातीपासून होता की त्यानं नंतर ही कारणामुळं असा बनला हे जाणून घेण्यासाठी त्याच्या जीवनावर एक नजर टाकायला हवी.

कुटुंबीयांसोबत वाद

कलिगुला रोमचा तिसरा सम्राट होता. त्याचं पुर्ण नावं होतं, ‘गयास जुलियस सीजर जर्मेनिसकस’. नंतर तो किलगुला नावानं प्रसिद्ध झाला. त्याच्या कामांमुळं त्याला इतिहासानं वेडा राजा असं संबोधलं. ३१ ऑगस्ट इसवी सन १२ ला त्याच्या जन्म झाला. वजील जर्मेनिसकस आणि आई अग्रिप्पिनाच्या सहा मुलांमध्ये तो तिसरा होता. कलिगुलाचा संबंध रोमन साम्राज्यातील सर्वात प्रतिष्ठीत परिवाराशी होता. त्याचे पणजोबा जुलियस सीजर होते तर आजोबां ऑगस्ट्स होते. त्याचे वडीलसुद्धा रोमन साम्राज्यातील सर्वात लोकप्रिय व्यक्तींपैकी एक होते. कलिगुलानं वयाच्या तिसऱ्या वर्षी युद्धविषय शिक्षण घ्यायला सुरुवात केली.

परंपरेनूसार त्यानं वर्दी आणि लहान बुट घातले. त्याला पाहून कलिगुला (लहान बुट) असं म्हणटंल गेलं. त्यादिवसापासून या नावानं त्याची ओळख बनली. कलिगुला लहानपणातच त्याच्या आजोबांचं ऑस्टसचं राज्य लयाला जायला सुरुवात झाली होती. ते अस्वस्थ होते. यातच त्यांचा मुत्रू झाला. त्यांचा दुसरा मुलगा टाइबेरिसला ऑगस्टस यांनी उत्तराधिकारी नेमलं होतं. कालिगुला भावाचा आणि वडीलांचा टाइबेरीसनं कट रचून खून केला. १९ ऑगस्ट इसवीसन १४ ला ऑगस्टसचा मृत्यू झाला.

यानंतर रोमन साम्राज्याची सत्ता टाइबेरिसच्या हातात आली. टाइबेरीस धोखेबाज होता. लोक त्याचा तिस्कार करायचे. त्याला भिती होती की जनता त्याच्या भावाला राजा घोषित करेल म्हणून त्याने भावाचा आणि पुतण्याचा खुन केला. त्याला एक लोकप्रिय शासक बनायचं होतं. यानंतर कालिगुला आईचा प्रचंड छळ करण्यात आला. टाइबेरिसनं त्यांना तुरुंगात टाकलं आणि या तुरुंगातच भुकेने तडफडून कालिगुला आईचा मृत्यू झाला. ऑस्ट्सची पत्नी कलिगुलाची आजी हिनं कलिगुलाला संभाळलं.

सम्राट बनून जनतेचा विश्वास जिंकला मात्र…

कालिगुलाला त्याच्या आजीनं क्रुर शासन टाइबेरिस याच्यापासून सुरक्षित ठेवलं. कालिगुलानं वडीलांच्या हत्याऱ्याचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. जेव्हा कालिगुला मोठा झाला तेव्हा त्यानं काही असे कारनामे केले ज्यावर खुश होऊन टाइबेरिसनं त्याला साम्राज्यात बोलावलं. सन ३१ मध्ये कालिगुलानं कॅपरी बेटावर कालिगुलाला भेटायला बोलावल.

कालिगुलानं रागाला शांत करत पित्याच्या खुन्यावर स्तुती सुमनं उधळली. टाइबेरीसचा विश्वसा जिंकण्यात तो यशस्वी झाला. नंतर टाइबेरिसनं त्याच्या मुलांसह कालिगुलाला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं. यानंतर लगेच सन ३७ मध्ये टाइबेरिस मरण पावला. जनता टाइबेरिसच्या हत्येसाठी कालिगुलाला दोषी ठरवत होती पण जनतेला त्याच्या रुपात आदर्शवादी पित्याचा मुलगा, उद्याचा शासक दिसत होता.

टाइबेरिस मरण पावल्यानंतर त्याच्या मुलांची एकापाठोपाठ हत्या कालिगुलानं घडवून आणली. टाइबेरिसच्या अन्यायकारी वागणूकीनं कैद केलेल्या नागरिकांची सुटका झाली. त्यानं जनतेचा विश्वास संपादित केला. लोकांच्या मनात पुन्हा स्वातंत्र्यांची भावना जागृत झाली. त्यानं जनतेच्या मनोरंजानासाठी नाटकं, क्रिडा, नृत्य, इत्यादी कार्यक्रमाचं आयोजन केलं. कालिगुलाच्या शासन काळाच्या सुरुवातीला जनात भरपूर खुश होती.

आणि सगळच बदललं

सम्राट बनल्याच्या काही महिन्यानंतरच कालिगुला भयंकर आजारी पडला. तो जगेल याची शक्यता नव्हती इतका आजार गंभीर होता. तो सहा महिने आजाराशी झुंजत राहिला. शेवटी एका बलाढ्या रोमन योद्ध्याप्रमाण त्यानं आजारावर मात केली. तो आजारातून परतला खरा पण आतून बाहेरून बदलून.

त्याचे डोळे आत गेले होते. तब्येत बारीक झाली होती. चेहरा लहान झाला होता. आपला सम्राट असा दुबळा, कमजोर आणि चिडचिडा झाला होता. त्याच्या चेहरा बकरीसारखा दिसोत असं लोक म्हणून लागले. या शब्दाची त्याला इतकी चीड यायला लागली की त्यानं बकरी असं नाव जो कुणी घेईल त्याला फाशीची शिक्षा दिली.

बहिणीशी गैरवर्तवणूक

कालिगुला आता नागरिरांना अपमानास्पद वागणूक देऊ लागला. जनतेत त्याची प्रतिमा वेड्या राज्याची बनली. त्याची बहिण जुलिया याच्याशी त्याचे अनैतिक संबंधही राहिले. तिच्या मृत्यूनंतर कालिगुलानं तिचं मंदिर बांधलं. या मंदिरात मुर्तीची प्रतिष्ठापना करुन ‘प्रेमाचं मंदिर’ असं या मंदिराला नाव दिलं. कालिगुलानं चार लग्न केली. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यानं दोन दोन स्त्रीयांच अपहरण करुन त्यांच्याशी लग्न केलं. त्यातली एक विवाहीत स्त्री होती. त्याची चौथी बायको ‘मिलोनिया’ होतं. तिनं कालिगुलाला नियंत्रणात आणण्याचा बराच प्रयत्न केला.

तिचे प्रयत्न अपयशी ठरले. तो कधीच नियंत्रणात आला नाही. वेळेसोबत त्याचं वेड वाढत गेलं. एकदा तर त्यानं मित्रांसमोर मिलोनियाला नग्न अवस्थेत परेड करायला लावली होती. कोणताही सुदर पुरुष दिसला की कालिगुला त्यताला जाळून मारायचा. लांब केसाचा पुरुष दिसला की त्याचा शिरच्छेद करायचा. कधी कधी सोबत प्रवास करणाऱ्या मंत्र्यांना घोड्यावरुन खाली उतरवायचा आणि लांबपर्यंत चालायला लावायचा.

सोन्याची नाणी बाथ टबमध्ये टाकून तो अंघोळ करायचा. फर्शीवर सोन्याची नाणी अंथरुन त्यावर तो चालायचा. त्याला घोड्यांची आवड होती. घोड्यांच्या खेळासाठी तो भरपूर पैसा खर्च करायचा. मित्रांसोबत तो घोड्यांच्या शर्यती पहायला जायचा. एखाद्या मित्राचा घोडा जिंकला तर त्या मित्राला तो जीवे मारायचा.

वेडेपणाच्या साऱ्या सीमा त्यानं पार केल्या होत्या. नंतर तर तो मुलींचे कपडे घालून फिरत होता. त्याला रोममध्ये देवाचा दर्जा हवा होता. त्याच्या मुर्त्या संपूर्ण रोमन साम्राज्यात उभारण्यात याव्यात असं त्यानं सांगितलं होतं. राज्यात दुष्काळ पडला. जनता तडफडू लागली. रोमन सम्राटांपैकी सर्वाधिक घृणा त्याच्या वाट्याला आली.

४१ साली त्यानं खेळाचं आयोजन केलं होतं. त्यावेळीच त्याची हत्या करण्यात आली. त्याची पत्नी आणि मुलीला ही मारण्यात आलं. रोमन साम्राज्याची सत्ता क्लॉडियसनं हातात घेतली आणि अशा पद्धतीनं सनकी सम्राटाचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button