
मुंबईतल्या गुन्हेगारीचा विचार केला तर काही ठरलेली नावं समोर येतात. करीम लाला, दाऊद इब्राहिम कासकर, हाजी मस्तान मिर्झा. हे मुंबईची एकेकाळची डॉन. यांनी मुंबईतल्या गुन्हेगारीला खतपाणी घातलं. पण मुंबईच्या गुन्हेगारीत काही स्त्रियांची नावंही आघाडीवर होती. त्यांनी अनेक मोठ्या गुन्हेगारांशी मिळून अनेक गुन्हे केले. बऱ्याच गुन्हेगारांना लपण्यासाठी मदत केली. अशाच एका लेडी डॉनचं नाव आहे गंगुबाई काठियावाड.
गंगुबाईच्या जीवनावर हुसेन झहीदी यांनी ‘माफिया क्विन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकात गंगुबाईची गोष्टही लिहिली आहे. आत्ताच बॉलीवूडने गंगुबाईच्या जीवनावर चित्रपट करत असल्याची घोषणाहि केली आहे. अभिनेत्री आलिया भट यात गंगुबाई काठियावाड यांच्या पात्राची भूमिका साकारणार आहे. नक्की कोण होती गंगुबाई आणि ती गुन्हेगारी क्षेत्राकडे कशी वळली या गोष्टी आज जाणून घेऊया.
६०च्या दशकात मुंबईत गुन्हेगारी वाढली होती. करीम लाला आणिइतर टोळ्या मुंबईच्या वेगवेगळ्या भागांवर राज्य करत होत्या. पण यांच्यासोबतच काम करत होती एक बाई. ही बाई खूप खतरनाक होती.हिला कामाठिपूराची मॅडम म्हणूनही ओळखलं जायचं. तिचं नाव होतं गंगुबाई काठीवाडी. गंगुबाईला गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. त्याउलट ती खूपप्रतिष्ठित कुटुंबातून होती. गुजरातमधल्या काठियावाड मधलं हे कुटुंब होतं. लहानपणी गांगुबाईला अभिनेत्री व्हायचं होतं. सिनेमात काम करायचं होतं. पण गांगुबाईच्या नशिबात काहीतरी वेगळच होतं.
कॉलेजमध्ये असताना गंगूबाई रमणिकलाल नावाच्या मुलाच्याप्रेमात पडली अन इथून तिचं आयुष्यच बदललं. रमणिकलाल गंगूबाईच्या वडीलांचा अकाउंटंट होता. गंगूबाई आणि रमणिकलालने पळूनजाऊन लग्न केलं. आणि मुंबईत आले. मुंबईत रमणिकलालने 500 रुपयांसाठी गांगुबाईला वेश्यालयात विकलं.
गंगूबाईसाठी हे सगळं धक्कादायक होतं. पण आता गंगूबाई कठोरझाली होती. कामाठिपुरानंच तिला कठोर बनवलं होतं. कामाठिपुरावर त्यावेळी मुंबईतलाकुख्यात डॉन करीम लालाचं राज्य होतं. असं सांगितलं जातं की एकदा करीम लालाच्या एका गुंडाने, गंगूबाईवर बलात्कार केला होता. पण यानंतर गंगूबाई हिम्मतीने न्याय मागायला करीम लालाकडे गेली. या भेटीदरम्यान गांगुबाईने करीम लालाला राखी बांधल्याचंही सांगितलं जातं.
स्वतः वेश्याव्यवसायाची बळी ठरलेली गंगूबाई, 60 च्या दशकात मात्र कामाठीपुरातली खतरनाक दलाल झाली. अंडरवर्ल्ड मधलेमोठमोठे गुन्हेगार तिचे क्लायंट होते. पण गंगूबाईबद्दल एक चांगली गोष्टही बोललीजाते. वेश्यालयात विकल्या जाणार्या मुलींबद्दल गंगूबाई प्रचंड हळवी होती. तिच्या आयुष्यात तिने एकाही मुलीला वेश्या व्यवसायात येण्यासाठी बळजबरी केली नाही. एका मोठ्या टोळीतल्या गुंडाने एका मुलीवर बलात्कार केल्यानंतर त्यांच्याशीही पंगा गांगुबाईनं घेतला होता. गांगुबाईने नेहमी वेश्या व्यवसायात असणार्या स्त्रियांच्या प्रगतीसाठी काम केलं आणि त्यांच्या मुलांच्या भाल्यासाठीही प्रयत्न केले. असं असलं तरीही तिची गुन्हेगारी बाजू मात्र याने लपत नाही.भारतातल्या वेगवेगळ्या शहरात वेश्यालयांची फ्रँचाइजी सुरू करणारी गंगूबाई पहिली स्त्री होती. वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्सच्या धंद्यात आणि अनेकांच्या खुणा मागेही तिचा हात असल्याचं बोललं जातं.
एकदा गंगूबाई सेक्स वर्कर्सचे प्रश्न मांडण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंनाही भेटली होती. तेव्हा नेहरू तिचं बोलणं आणि नेतृत्वगुण पाहून प्रभावित झाले होते, नोकरी करू शकत असताना वेश्या व्यवसायात का आलीस असा प्रश्नही त्यांनी तिला विचरला होता. कामाठीपुरात रहात असली तरी गांगुबाई श्रीमंत झाली होती. तिला कामाठीपूराची मॅडम म्हटलं जाऊ लागलं होतं. मुंबईतल्या अनेक डॉन आणि माफियांची पालक गंगूबाई होती. ती त्यांना संरक्षक निवारा पुरवायची.
गुन्हेगारी क्षेत्रात तिचं नाव असलं तरीही कामाठिपुरात तिने केलेली चांगली कामंही होती. वेश्या व्यवसायातल्या मुलींचा तिने आईसारखा सांभाळ केलाअसं कामाठीपुरतले लोक म्हणतात. कदाचित त्यामुळेच आजही कामाठिपूरतल्या अनेक घरातल्या भिंतींवर गंगूबाईचा फोटो पाहायला मिळतो. हुसेन झहीदींच्या ‘माफिया क्विन्स ऑफ मुंबई’या पुस्तकात गंगुबाईची संपूर्ण गोष्ट आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला