राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष शेख यांना संरक्षण कोणाचे?

Mehboob Sheikh

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Sheikh) हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. औरंगाबादमधील एका तरुणीने त्यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. नोकरीचे आमिष दाखवून आपल्यावर अत्याचार करण्यात आले असे या तक्रारीत तिने म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेषता भाजपने औरंगाबाद, जालना, बीडमध्ये त्यांच्या विरोधात निदर्शने केली आणि मेहबूब शेख यांना तत्काळ अटक करावी तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनीही तत्काळ कारवाईची मागणी केली. आता तर शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केल्याने मेहबूब शेख यांच्यावर आता अटकेची कारवाई होणार का याबाबत उत्सुकता आहे. या घटनेची चौकशी उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत करावी अशी मागणीही नीलमताईंनी केली आहे. राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या वाढत्या घटनांचा दाखला देत नीलमताईंनी सरकारला घरचा अहेर दिला आहे.

मेहबूब शेख बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. बीड औरंगाबादमध्ये त्यांचे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे असेदेखील नाही पण तरीही त्याला थेट प्रदेशाध्यक्ष करण्यात आले याला कारण मुंबईतील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या वर्तुळात त्याचा वावर असतो.

या कथित घटनेतील अत्याचारपीडित तरुणी ही उच्चशिक्षित आहे. तिला मुंबईत शिक्षिकेची नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखवून मेहबूब शेखने तिला जाळ्यात ओढले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला असे तिचे म्हणणे आहे. ही घटना दीड महिन्यापूर्वीची आहे. या घटनेचा धक्का बसला आणि ती आजारी पडली. आजारपणातून बाहेर पडताच आपण पोलिसात तक्रार केली असे तिने म्हटले आहे. दुसरीकडे आपण निर्दोष असल्याचे मेहबूब शेख असे म्हणणे आहे अत्याचार पीडित तरुणी ज्या तारखेला अत्याचार झाल्याचे सांगत आहे त्या दिवशी आपण औरंगाबादमध्ये नव्हतो तर मुंबईत होतो असे सांगत शेख याने आरोप फेटाळले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER