हा प्रायव्हेट टोल कुठला आणि कोणाचा? – चित्रा वाघ

Chitra Wagh - Maharastra Today
Chitra Wagh - Maharastra Today

पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर १ एप्रिलपासून ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना या टोलनाक्याच्या दरवाढीचा त्रास होत आहे. याबाबतचा व्हिडीओ भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केला. हा प्रायव्हेट टोल कुठला? ही वसुली कुणासाठी चालू आहे? असे प्रश्न उपस्थित करत टोलबाबत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

सातारा-पुणे महामार्गावरील खेड-शिवापूर या दोन टोलनाक्यावर ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. या टोल नाक्यावरून एक कुटुंबीय जात असताना त्यांना टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याने  अडवले. वाढीव दराप्रमाणे टोल देण्यास सांगितले. मात्र, त्यांनी नकार दिला. या कुटुंबीयांनी टोलचे जास्त पैसे देणार नाही, असे म्हणाले. मात्र, १९० रुपये द्या, पण पावती देणार नाही, असे टोलचे कर्मचारी म्हणाले. तसेच पोलिसांतही तक्रार करा अथवा पोलिसांना बोलावून आणा आम्ही त्यांना घाबरत नाही, असेदेखील ते म्हणाले. यात सर्वसामान्यांना टोल दरवाढीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केला.

तसेच या घटनेची मागणी मंत्री एकनाथ खडसे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पुणे ग्रामीण पोलिसांनी करावी, अशी मागणी केली आहे. “ही कसली दादागिरी चालू आहे खेड-शिवापूर टोल नाक्यावर… हा प्रायव्हेट टोल कुठला आणि कुणाचा? १९० रु. द्या पण पावती देणार नाही म्हणतात, पोलिसांनाही घाबरत नाही, करा तक्रार म्हणताहेत, ही टोळी कुणाची व कुणासाठी वसुली चालू आहे?” असे ट्विट करत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावर ६५ रुपये टोल आकारला जात होता. मात्र, आता तो ७० रुपये केला आहे.

गेल्या १० वर्षांपासून या महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम रखडलेले आहे. रस्ते खराब असताना टोलवाढ केली जाते. आनेवाडी टोल नाक्याला मोटारी, हलकी वाहने यांना एकेरी प्रवासाकरिता ७० तर दुहेरी प्रवासाकरिता १०५, हलक्या व्यावसायिक वाहनांना अनुक्रमे ११० आणि १७०, बस किंवा ट्रककरिता २३५ आणि ३५० तर मल्टी अ‍ॅक्सल वाहनांना एकेरी प्रवासाकरिता ३६५ तर दुहेरी प्रवासाकरिता ४५० रुपये टोल द्यावा लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button