धारावीने करून दाखवले …; जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक

WHO on CM Thackeray and dharavi Corona cases

मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . त्यातही मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे . याचदरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीनं कोरोनाविरोधातील लढा यशस्वी करुन दाखवला आहे. कोरोना रुग्णांचा सर्वाधिक आकडा आढळून आलेल्या धारावीत प्रशासनाच्या उपाययोजनांचा परिणाम म्हणून कोरोना संक्रमणात आश्चर्यकारकरीत्या घट झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही आता याची दखल घेण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र आले असून या पत्रात ठाकरेंचे कौतुक करण्यात आले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख टेड्रोस अडॅनॉम गेब्रेयसिस म्हणाले की, कोरोनाचे संक्रमण वेगाने झाल्यावर सरकारने त्यावर नियंत्रण मिळवल्याचे धारावी हे उत्तम उदाहरण आहे.

धारावीतील झोपडपट्टीच्या भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाकडूनही चिंता व्यक्त केली जात होती. कोरोना संक्रमितांचा आकडा दररोज वेगाने वाढू लागला. मात्र यावर अटकाव घालत मुंबई शहरातील धारावीच्या हाॅटस्पाॅटने आता कोरोनामुक्तीच्या दिशेने पाऊले टाकली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER