स्फोटक भरलेली ती स्कार्पिओ रात्री १ वाजता कोणी ठेवली ?

SUV With Explosives Outside Mukesh Ambani's Home

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटके भरलेली स्कार्पिओ तिथे रात्री १ वाजता ठ्वली होती, असे उघड झाले आहे. याबाबत माहिती मिळताच एटीएसचे अधिकारी आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि गाडी सुरक्षित स्थळी हलवली. गाडीत जिलेटीनच्या २० कांड्या सापडल्या आहेत.

पेडर रोड परिसरातील कारमायकल रोडवर ही गाडी आढळली. आता पोलीस CCTV कॅमेऱ्यावरून तपास सुरू आहे. गाडीच्या नंबर प्लेटवरून मालकाचा शोध घेणे सुरू आहे.

गाडी नो पार्किंगमध्ये उभी असल्याने ट्रॅफिक हवालदाराने १ वाजता गाडीला जॅमर लावला होता. गाडीचा मालक न आल्याने सायंकाळी ६ वाजेपासून चौकशी सुरू झाली. बॉम्ब शोधक पथक बोलावण्यात आले.

गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. या घटनेची चौकशी मुंबई क्राइम ब्रँच करते आहे. लवकरात लवकर सत्य समोर येईल”, असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER