आदर पुनावालांना कोण धमक्या देते ? खरंखोटं देशाला कळायला हवं ; जितेंद्र आव्हाड

Maharashtra Today

मुंबई :- सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं बोलून दाखवलं आहे. त्यासंबंधी बोलताना त्यांनी भारतातील धनदांडग्या आणि मोठ्या राजकीय नेत्यांकडून धमक्या येत आहेत आणि दबाव निर्माण होत आहे असेही म्हटले आहे. त्याचबरोबर माझं शिर कापलं जाईल, अशाही धमक्या मिळत असल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले.

कोरोना लसीचे उत्पादन सध्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होत आहे. परंतु, राजकीय धमक्यामुळे आणि दबावामुळे ते उत्पादन लंडनमध्ये सुरू करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अदर पूनावाला यांनी केलेला खुलासा हा गंभीर असून त्यातील खरं खोटं तपासण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले. तसेच कोरोना लसीचे उत्पादन करणारे अदर पूनावाला हे अचानक लंडनला का निघून गेले? हे भारतातील प्रत्येक नागरिकाला कळायला हवं, असे आव्हाड यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.

अदर पूनावाला यांना शीर कापले जाईल, अशा धमक्या मिळत आहेत. म्हणजे हे प्रकरण गंभीर असून याचा शोध घ्यायला हवा. अशा आशयाचे ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात भारतातील नागरिकांना कळायला हवं अशी मागणी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button