खरा सामनावीर कोण? हार्दिक पांड्या की टी. नटराजन?

T. Natarajan - Hardik Pandya

भारताच्या (India) दुसऱ्या टी-२० सामन्यातील ऑस्ट्रेलियावरील (Australia) विजयात २२ चेंडूंत नाबाद ४२ धावांच्या खेळीसाठी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) सामनावीर पुरस्कार देण्यात आला. १९५ धावांचे आव्हान पेलण्यात निःसंशय हार्दिकच्या या खेळीने महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी चार षटकांत फक्त २० धावा देऊन दोन बळी मिळवणारा टी. नटराजन (T. Natrajan) हा खरा सामनावीर होता, असे बहुतेकांचे मत आहे; मात्र त्याला सामनावीर म्हणून न निवडता अन्यायच झाल्याची आणि नेहमीप्रमाणे गोलंदाजांना डावलतात तसे यावेळी गोलंदाजालाच डावलण्यात आल्याची क्रिकेटप्रेमींची भावना आहे.

या सामन्यात जिथे ऑस्ट्रेलियाने २० षटकांतच ९.८० च्या धावगतीने ५ बाद १९४ असा धावांचा डोंगर रचला. त्यात नटराजन वगळता प्रत्येक भारतीय गोलंदाजाने सव्वाआठपेक्षा अधिकच धावा प्रतिषटकाला मोजल्या. त्यात नटराजनने चार षटकांत फक्त २० धावाच दिल्या. त्यात दोन गडीसुद्धा बाद केले. त्यांच्या गोलंदाजीवर केवळ एकदाच, तोसुद्धा डावातील शेवटच्या चेंडूवर चेंडू सीमापार झाला. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २०० च्या आत राहिली; अन्यथा २१० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करावा लागला असता ही वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे नटराजनच्या गोलंदाजीचे महत्त्व आहेच. हार्दिकच्या समर्थनात दावा करण्यात येतो की डावाच्या शेवटी शेवटी , सरासरी १२ व १३ च्या गतीने धावा करायच्या असताना हार्दिकने फटकेबाजी केली नसती तर विजय मिळाला नसता हेसुद्धा खरे असले तरी नटराजनने ब्रेक लावले नसते तर आवश्यक धावगती हार्दिकच्याही आवाक्याबाहेरची राहिली असती हे मान्य करावेच लागेल. अनेक माजी क्रिकेटपटूंनीसुद्धा हेच मत व्यक्त केले आहे. आकडेवारीसुद्धा हेच सांगते…सामन्यात टारगेट धावगती होती ९.८० धावा प्रतिषटक. त्यात पांड्याने धावा केल्या २२ चेंडूंत ४२ म्हणजे ११.४५ च्या धावगतीने आणि नटराजनने दिलेल्या धावांची गती होती फक्त ५ धावा प्रतिषटक.

आता आवश्यक धावगतीपेक्षा हार्दिकची धावगती राहिली +१.६५ मात्र त्याचवेळी नटराजनने प्रतिषटक वाचवलेल्या धावांची गती राहिली ९.८०- ५.०० = +४.८० धावा प्रतिषटक. हा फरकच खरा सामनावीर कोण होता हे स्पष्ट करणारा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER