शासनाची चार खाती चालवणाऱ्या ‘त्या’ व्यक्ती कोण? – आशिष शेलार

Ashish Shelar

मुंबई :- देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी निकक्षून  सांगितले होते की, फ्रंटलाईन वर्कर्सना प्रथम लस देण्यात येईल असे असताना ठाण्याचे महपौर, एक शिवसेना आमदार आणि वरळीतील इंडिया बुलच्या कर्मचाऱ्यांनी कोविड लस घेतली, अशी माहिती देऊन विधानसभेत भाजपा आमदार  आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी माझे सरकार म्हणून मग सरकारला माझे कसे म्हणायचे, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्र सरकार हे आपले सरकार आहे असे प्रचार करते; पण शासनाची चार खाती मंत्री किंवा अधिकारी नाही; पण वेगळीच माणसे चालवत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशांत नीलांंबरी, उद्योग विभाग गिरीश पवार, नगर विकास विभाग अजय आशर, गृहनिर्माण विभाग कीर्तिकुमार केडिया हे चालवत आहेत. या व्यक्ती कोण आहेत? तर उच्च शिक्षण मंत्री यांच्याकडे १५ ते २० कर्मचारी कर्जाऊ घेण्यात आले आहेत.

मग जर शासनाची चार खाती बाहेरच्या व्यक्ती चालवतात, एका खात्यात कर्मचारी कर्जाऊ आहेत तर एमएमआरडीएसारख्या महत्त्वाच्या प्राधिकरणावर आर . ए. राजीव यांना कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार आहे. मग हे सरकार आपले सरकार कसे? असा सवाल त्यांनी केला. कोरोना काळात सरकारने जे काम केले त्यावरून सरकार आपली पाट थोपटून घेते; पण या काळात खाजगी रुग्णालयांंनी कसे लुटले याची उदाहरणे देऊन आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच नुकतेच कमला मिलमधील पबमध्ये रात्री उशिरापर्यंत कोरोनाचे नियम न पाळता गर्दी केल्याचे व्हिडीओ समोर आले होते. अशांचे धाडस का होते? याच कमला मिलमध्ये २९ डिसेंबर २०१७ रोजी लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी १५ जणांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी रमेश गोवानी आणि रवी भंडारी या दोन  मिल मालकांनी न्यायालयात जाऊन दोषमुक्त करून घेतले.

त्या विरोधात सरकारने अपिल करावे अशी मागणी आम्ही केली. पण अद्याप या प्रकरणी सरकारने अपिल का केले नाही? यातूनच काही प्रवृत्ती वाढतात असे सांगत आमदार आशिष शेलार यांनी सरकारचे नियम तोडणाऱ्यांंवर कडक कारवाई करा, अशी मागणी केली. मेट्रोची कारशेड आरेमधून कांजूर मार्गला आणण्याचा हट्ट केला जातोय; पण यात काही जमीन मालकांच्या फायद्यासाठी करीत तर नाही ना? असे आम्ही वारंवार सांगत होतो. नुकतेच न्यायालयात सरकारने मालकांना नुकसान भरपाई देऊ, असे सांगते आहे. हेच आम्ही सांगत होतो, असे सांगून आमदार आशिष शेलार यांनी कांजूर मार्ग प्रकरणी सरकारच्या हेतूबाबतच शंका उपस्थित केली.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये बोगस नावे घुसवून इंडिया बुलच्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली. या प्रकरणी पालिका अतिरिक्त आयुक्त कंकाणी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेशही दिले आहेत, अशी माहिती आपल्या राज्यापालांच्या अभिभाषणावरील चर्चेत दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER