काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जाणून घेतले पवारांचे मत

H.K. Patil - Sharad Pawar

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी सुरु असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत मंगळवारी रात्री उशीरापर्यंत काँग्रेसच्या गोटात खलबते सुरु होती. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील (H. K. Patil) यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), भाई जगताप (Bhai Jagtap) आणि चरणसिंग सप्रा (Charan Singh Sapra) या प्रमुख नेत्यांबरोबर बराचवेळ चर्चा केली. या दीर्घ चर्चेनंतर आज एच. के. पाटील यांनी नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावावर मत जाणून घेण्यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर त्यांच्यात भेट झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीत महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) योग्य समन्वय साधू शकणार चेहरा हवा, जेणेकरून आघाडीत कुठलेही मतभेद समोर यायला नको, असे मत पवारांनी एच. के. पाटील यांच्याकडे व्यक्त केले. दरम्यान, शरद पवार हे राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव यांचे नाव पुढे करु शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच एच. के. पाटील आणीन पवारांमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीवरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडण्याची शक्यता असून सातव, चव्हाण आणि पटोले यांच्यापैकी एका नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे जाण्याची शक्यता असल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत. आज सायंकाळी नव्या प्रदेशाध्यक्षाचे नवा घोषित केले जाण्याची शक्यता आहे.

ही बातमी पण वाचा : ‘शरद पवार संपूर्ण देशाचे नेते, केवळ साहित्य संमेलनासाठी त्यांना ‘छोटे’ करू नका’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER