उत्तराखंडातील नवे मुख्यमंत्री कोण; त्रिवेंद्र सिंह रावतांच्या जागी कुणाला संधी?

trivendra singh rawat

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या राजकारणात हालचाली पाहायला मिळत आहेत. रोज नव्या घडामोडी घडत आहेत. राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशावेळी सोमवारी भाजपाच्या कोअर ग्रुपची बैठक पार पडली. या बैठकीत उत्तराखंडचे प्रभारी दुष्यंत गौतम उपस्थित होते. दरम्यान, बैठकीत नेतृत्व बदलाच्या विषयावर कुठलीही चर्चा झाली नाही.

भाजपाच्या कोअर ग्रुपच्या बैठकीत नेतृत्व बदलाबाबत चर्चा झाली नसल्याचे सांगितले, तरी उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या जागी नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. त्रिवेंद्र सिंह रावत दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. दौऱ्यात ते पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. कोअर कमिटीची बैठक पूर्वनियोजित नव्हती. अचानक झालेल्या या बैठकीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपाची ही बैठक राजधानी गॅरसॅन इथे पार पडली. मुख्यमंत्री रावत यांनाही या बैठकीबाबत कल्पना नसल्याचे सांगण्यात येत आहे.

रावतांच्या जागी कुणाला संधी?

माहितीनुसार उत्तराखंडमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली घडत आहेत. अशावेळी रावत यांच्या जागी धन सिंह रावत किंवा सतपाल महाराज यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या नावांबाबत सर्व आमदारांच्या सहमतीवर काम चालले आहे. जर या दोन्ही नावांवर एकमत झाले नाही, तर केद्र सरकारकडून नैनीतालचे लोकसभा खासदार अजय भट्ट आणि राज्यसभा खासदार अनिल बलूनी यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER