सचिन वाझेंना शिवसेनेत आणणारा ‘तो’ नेता कोण? राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackeray - Shiv Sena - Sachin Vaze - Maharashtra Today

मुंबई : ख्वाजा युनूस (Khwaja Yunus) प्रकरणात १७ वर्षे निलंबित असलेल्या सचिन वाझे (Sachin Vaze) यांना शिवसेनेत कोणी आणले, त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी नेणारी ती व्यक्ती कोण होती, असा सवाल मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला. ते रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजप (BJP) आणि शिवसेनेचे (Shiv Sena) सरकार असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेण्याची विनंती केली होती, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले होते. याचा अर्थ सचिन वाझे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

यावेळी राज ठाकरे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण कल्पनेपेक्षा अधिक धक्कादायक असल्याचा दावा केला. त्यासाठी हे प्रकरण फक्त सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्यापुरते मर्यादित राहता कामा नये. हा विषय दुसरीकडे भरकटता कामा नये. त्यासाठी केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून त्याची कसून चौकशी करावी. ही चौकशी खरंच नीटपणे पार पडली तर अक्षरश: फटाक्यांची माळ लागेल. या सगळ्यात कोण कोण आत जाईल, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. या सगळ्यात अनेक धक्कादायक चेहरे समोर येतील, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER