कोण आहे क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कोविड-19 बदली खेळाडू?

Ben Lister

क्रिकेटच्या इतिहासात बेन लिस्टर (Ben Lister) नावाच्या खेळाडूची कायमसाठी एक विशेष नोंद झाली आहे. हा खेळाडू क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कोविड- 19 (Covid-19) बदली खेळाडू ठरला आहे. गेल्या आठवड्यात आॕकलंडसाठी ओटॕगोविरुध्दच्या सामन्यात प्लंकेट शिल्ड (Plunkett Shield) प्रथम श्रेणी स्पर्धेत हा इतिहास घडला.

आॕकलंडचा खेळाडू मार्क चॕपमन (Mark Chapman) याच्या जागी त्याला संधी मिळाली आहे. मार्क चॕपमनला सामन्याच्या आधी अस्वस्थ वाटू लागले होते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) च्या नियमावलीनुसार त्याला सामना न खेळता कोविड- 19 च्या चाचणीला सामोरे जावे लागले आणि त्याच्या जागी बेन लिस्टर याला संधी देण्यात आली. आयसीसीने यंदा जूनमध्येच कसोटी सामन्यांसाठी कोविड-19 साठी बदली खेळाडूंना परवानगी दिली आहे. मात्र विविध मंडळांनी स्थानिक स्पर्धांसाठी ही नियमावली लागू केली आहे.

26 वर्षीय चॕपमनने न्यूझीलंडसाठी सहा वन डे आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत.

लिस्टर हा डावखुरा मध्यमगती गोलंदाज असून त्याने पहिल्या डावात 40 धावात एक गडी बाद केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER