परिवहन विभागात कोण आहे सचिन वाझे? अनिल परबांवर काय आहे आरोप?

Sachin Vaze - Anil Parab

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) हे पोलीस अधिकारी सचिन वाझेने (Sachin Vaze) एनआयएकडे (NIA) दिलेल्या लेखी कबुली जबाबामुळे आधीच अडचणीत आलेले असताना आता परिवहन विभागात बदल्यांचे घोटाळ्यांवर घोटाळे झाल्याची तक्रार थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि सीबीआयकडे (CBI) करण्यात आली आहे.

सचिन वाझेने केलेले आरोप खोटे आहेत हे सांगताना परब यांनी, शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि स्वत:च्या दोन मुलींची शपथ घेतली होती. आता परिवहन विभागातील बदली घोटाळ्याचा इन्कार करताना ते कोणाची शपथ घेतात ते पहायचे.

भाजपचे (BJP) माजी खासदार किरिट सोमय्या (Kirit Somaiya) हे गेले काही दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून (CM Uddhav Thackeray) महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) मंत्र्यांवर आरोपांमागून आरोप करीत असून प्रत्येक आरोपाचे लेखी पुरावे आपल्याकडे आहेत असा त्यांचा दावा असतो. आता त्यांनी परिवहन विभागातही एक सचिन वाझे असल्याचा दावा केला आहे. बजरंग खरमाटे असे त्याचे नाव आहे. खरमाटे हे वर्धा येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत. मात्र, ते नागपूर कार्यालयातच बसतात. वर्धेला ते जात देखील नाहीत. त्यांचे केबिन गेले तीन वर्षे बंदच असते. त्यांच्या जागी वर्धेच्या कार्यालयात विजय तिरालकर हे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत तेच काम पाहतात. खरमाटे हे परिवहन विभागात अत्यंत प्रभावशाली अधिकारी मानले जातात. सत्ताकर्त्यांशी त्यांची जवळीक आहे. मुंबईच्या पोलीस दलात सचिन वाझे हा बडे अधिकारी, काही सत्ताकर्त्यांसाठी खंडणी वसुुलीचे काम करत होता असा विषय सध्या ऐरणीवर आहे. त्याच धर्तीवर बजरंग खरमाटे हा परिवहन विभागातील सचिन वाझे असल्याचा चिमटा किरिट सोमय्या यांनी काढला आहे.

सोमय्या यांनी असा दावा केला आहे की परिवहन विभागातील बदली रॅकेटबाबत त्यांच्याकडे एक तक्रार आलेली आहे. बदल्यांचे रेट किती  २५ लाख, ५० लाख, एक कोटी की आणखी किती या बाबतची माहिती त्यात आहे. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे यासाठी त्यांनी आता राज्यपाल व सीबीआयकडे मागणी केली आहे. परिवहन विभागात बदलीसाठी मोठ्या रकमा मोजल्याशिवाय काम होत नाही अशी चर्चा आहे. आता सध्या १८ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाºयांच्या पदोन्नतीचा प्रश्न ऐरणीवर आहे आणि त्यासाठीही काही दलाल लोक अधिकाºयांना भेटत असल्याचे बोलले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button