‘या दुर्घटनेला कोण जबाबदार?’ संबंधितांवर कारवाई व्हावी; भाजपची मागणी

Pravin Darekar - Gopal Shetty

मुंबई : मुसळधार पावसामुळे मालाडमधील मालवणी भागात चार मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला तर ७ जण गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेनंतर भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबतची माहिती दरेकरांनी ट्विट करून दिली.

घटनास्थळाची पाहणी करताना प्रवीण दरेकरांनी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, “मालवणी (मालाड) येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी केली. यावेळी योगायोगाने महापौर किशोरीताई पेडणेकर (Kishori Pednekar) देखील उपस्थित होत्या. ह्या भागात चार-चार माळ्यांच्या अनधिकृत झोपड्या उभ्या राहात आहेत. यामुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो, अशा आशयाचे पत्र देऊनदेखील त्याकडे दुर्लक्ष केल्याची बाब महापौरांच्या निदर्शनास यावेळी आणून दिली.

या दुर्घटनेला कोण जबाबदार? यावर तर्कवितर्क लावत बसण्यापेक्षा संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासन यावेळी महापौर पेडणेकरांनी दिले. तसेच इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.” अशी माहिती त्यांनी दिली.

मी अधिवेशनात याविषयी आवाज उठवणार आहे. येथे पालिका अधिकारी आणि इतर लोकांमध्ये साटंलोटं आहे. आर्थिक व्यवहार असल्यामुळे या अनधिकृत बांधकामांना अभय मिळत आहे. आजच्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूंना जबाबदार कोण? असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button