
भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात ट्विट करण्यासाठी पर्यावरणवादी स्वीडिश कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला (greta thunberg) पोएटिक जस्टिस फाउंडेशनने (पीजेएफ) ‘टूलकिट’ तयार करून दिले, असा संशय आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत हे लक्षात आले आहे. कॅनडामधील व्हँकुव्हरमधील संस्थेचा संस्थापक एम. धालीवाल याने हे टूलकिट तयार केले आहे. शेतकरी आंदोलनाच्या आडून भारतात फुटीरतावादी खलिस्तानी चळवळ भडकावण्याचा त्याचा कट आहे. त्याच्या संघटनेने ‘भारतविरोधी भावना भडकावण्याची पूर्ण योजना टूलकिट’मध्ये तयार केली होती. याचा एक व्हिडीओ मिळाला आहे. यात तो फुटीरतावादी खलिस्तानी आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन करताना दिसतो. धालीवालचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ २६ जानेवारीला भारतीय दूतावासाबाहेर चित्रित झाल्याचे सांगण्यात येत. तो म्हणतो – कृषी कायदे मागे घेतले तरी ते जिंकणार नाहीत.
कृषी कायदे मागे घेण्यापासून या लढाईला खरी सुरुवात होईल. ती तिथेच संपणार नाही. कृषी कायदे मागे घेतल्यावर आंदोलन संपले असे सांगू नका. यामुळे आंदोलनाची ऊर्जा नष्ट होईल. तुम्ही खलिस्तान आंदोलनापासून वेगळे व्हा, असे तुम्हाला सांगितले जाईल. पण तुम्ही वेगळे होऊ नका. ग्रेटा थनबर्गने सुरुवातीला शेअर केलेल्या ‘टूलकिट’मध्ये भारतीय दूतावासांना घेरण्याचे आवाहन करण्यात येईल. तसेच भारताला लक्ष्य करून अनेक देशांमधून जागतिक स्तरावर ट्विटस्टार्म केले जाईल.
हे कोणत्या तारखेला, कधी आणि कसे करायचे याबद्दलचा तपशीलही (टूलकिट) दस्तऐवजात होता. त्या टूलकिटमध्ये मुखपृष्ठावर आंदोलन करणार्या शेतकर्यांचा फोटो होता. ‘तुम्ही मानवी इतिहासाच्या सर्वांत मोठ्या आंदोलनाचा भाग व्हाल का?’ असं त्यावर इंग्रजीत लिहिलं होतं. हे सर्व ‘पोएटिक जस्टिस फाउंडेशन’ आणि ‘ग्रीन्स विथ फार्मर्स यूथ कोअलिशन’च्या वेबसाईटला लिंक होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला