घोटाळे बाहेर काढून महाराष्ट्रात वादळ निर्माण करणारे कोण आहेत ? किरीट सोमय्या? कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास?

Kirit Somaiya - Maharastra Today

भारतीय जनता पार्टीची (BJP) सत्ता येण्याआधी मुंबईतल्या एका नेत्यानं राज्य आणि देशातलं राजकारण डोक्यावर घेतलं होतं. भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्याकडून होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर धडाधड आरोप त्यांनी केले. सेना आणि सोमय्या एकमेकांविरुद्ध उभे असल्याचं नेहमी आपण पाहिलंय. मागच्या वर्षी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यातल्या जमीन व्यवहारावर प्रकाश टाकत आरोपांची लड लावली होती. आर्थिक घोटाळ्यांची नस ओळखून प्रकरण खनून बाहेर काढण्यात सोमय्या यांचा हतखंडा आहे. त्यांच्या राजकीय प्रवासावर टाकलेली ही एक नजर

राजकीय जीवन

मुंबईच्या मुलुंडमध्ये एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा जन्म झाला. १९७५ ला जयप्रकाश नारायण यांनी इंदिरांविरुद्ध दंड थोपटले. जे.पी. नारायण यांच्या हाकेला संपूर्ण हिंदोस्थान धावून गेला. त्यांच्यापैकी एक किरिट सोमय्या होते. जे. पी. मुमेंटमधूनचं त्यांच्यांमध्ये भ्रष्टाचारविरोधी तीव्र चिढ निर्माण झाली. सी.ए. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटच्या परिक्षेच्या गुणवत्ता यादीत पास होऊन पुढं आलेले किरिट सोमय्या. आर्थिक घोटाळ्यांना खोदून काढून माध्यमांसमोर त्यांनी अनेकदा मांडलंय. २००५ साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी मिळवली.

१९९१ मध्ये ते मुलुंड विधानसभा मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने विधानसभेवर निवडूण गेले. जेव्हा संपुर्ण मुंबई भाजपातली मंडळी त्यांच्या विरोधी होती तेव्हा त्यांनी ही कामगिरी साधली. तत्कालीन मुलुंडचे आमदार जेष्ठ नेते वामन परब यांना डावलून भाजपनं सोमय्या यांना संधी दिली होती. आमदारकीची कारकिर्द त्यांनी पुरती गाजवली. महत्त्वाचे कायदे मंजूर करुन घेणाऱ्या सोमय्या यांना राजकारणात रुळायला जास्त वेळ लागला नाही. याकाळात त्यांनी महत्त्वाचे कायदे मंजूर करुन घेतले. पुढं ईशान्य मुंबईमधून ते लोकसभा निवडणूकीत १९९९ ला जिंकले. कॉंग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांचा त्यांनी पराभव केला होता. १३ व्या लोकसभेत त्यांनी सर्वाधीक २७ पैकी ११ पिटीशन मांडल्या होत्या. ८०० हून अधिक प्रश्न त्यांनी पहिल्यांदाच लोकसभेत गेल्यावर विचारले. २०१४ ला राष्ट्रवादीचे तगडे नेते संजय दिना पाटील यांचा पराभव करत सोमय्या लोकसभेत पोहचले होते.

भ्रष्टाचारा बाहेर काढणारा नेता अशी प्रतिमा

सिंचन घोटाळ्यात अजित पवार आणि सुनिल तटकरेंना अडचणीत आणणाऱ्या, अशोक चव्हांणांचा आदर्श घोटाळा आणि छगन भुजबळांवर आरोप सोमय्या यांनी केले. युपीएच्या कार्यकाळात भाजपानं ‘स्कॅम एक्सपोज कमिटी’ म्हणजेच भ्रष्टाचार खनून काढणारी समती बनवली. किरीट सोमय्या त्याचे राष्ट्रीय आयोजक होते. त्यांनी देशातल्या १६ राज्यातल्या १०० जिल्ह्यात फिरून कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचे भ्रष्टाचार बाहेर काढले. असं असलं तरी कर्नाटकात भाजपचे नेते येडियुरप्पा यांच्यावर खाण घोटाळा असो की नितीन गडकरींवर (Nitin Gadkari) पुर्ती समुहावरील घोटाळ्याचा आरोप असो त्यांनी स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर कधीही आरोप केले नाहीत.

सेनेशी पंगा

कॉंग्रेस- राष्ट्रवादीची मिशन पुर्ण केल्यानंतर सोमय्या यांनी त्यांचा मोर्चा शिवसेनेकडे वळवला. शिवसेनेच्या ताब्यातून मुंबई मनपा जिंकण्याचा भाजपचा मनसुबा होता असं राजकीय विश्लेषक सांगतात.य यावेळी किरिट सोमय्या यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध मोर्चा उघडला. ठाकरे कुटुंबीयांचे पैशांचे व्यवहार शोधून काढत पत्रकार परिषदेत महत्त्वाची कागद पत्रं सादर केली. २०१७ला त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख बांद्रा माफिया असा केला होता. यानंतर सेना आणि सोमय्या वाद चांगलाच पेटला होता.

जनतेचा सेवक असल्याची प्रतिमा

जनतेचा सेवक अशी प्रतिमा तरुणपणापासूनच सोमय्या यांनी जपली आहे. गेल्या ३० वर्षात त्यांनी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन, आरोग्य सेवा स्वस्त दरात उपलब्ध करुन देणं, शिक्षण आणि खेळ विषयक पुढाकार अशी कामं केली आहेत. मुंबईत हिपेटायट बी विरुद्ध मोहीम उघडली. मोदीबिंदूच्या ४०० हून अधिक शस्त्रक्रिया घडवल्या. मुलुंड रेल्वे बॉम्ब स्फोटात जखमींना मदत. रेल्वे सुधारणेसाठी प्रयत्न केले आहेत. आताच्या राजकारणात सोमय्या यांना म्हणावं अशी जबाबदारी मिळत नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतायेत.

सदरील माहिती पुस्तक, वर्तमान, इंटनेटवरील स्त्रोतांमधून संकलीत केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button