
टीम इंडियामधील(Team India) सर्वात खट्याळ आणि ज्येष्ठ खेळाडूंचा लाडका असलेल्या युजवेंद्र चहलने(Yuzvendra Chahal ) आपल्या नव्या आयुष्यातील पहिली पायरी चढली आहे. आपल्या दिलखुलास शैलीसाठी ओळखल्या जाणार्या युजीने शनिवारी मंगेतर धनश्रीसोबत केलेल्या त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करुन जगाला आश्चर्यचकित केले. आयपीएलच्या तयारी दरम्यान चहल अशी काही बातमी देईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती.
मात्र हे फोटो पोस्ट होताच ही बातमी आगीसारखी पसरली. आता फेसबुक-ट्विटर किंवा इन्स्टाग्रामवर प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युझवेंद्रला त्याचे चाहते आणि सहकारी खेळाडू त्याचे अभिनंदन करत आहेत. यासह धनश्री वर्मा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी लोकं उत्सुक आहे.
धनश्री वर्मा(Dhanashree Mam) ही डॉक्टर, कोरिओग्राफर आणि यू ट्यूबर आहेत. म्हणजेच, ब्यूटी विद ब्रेनचे ते एक जबरदस्त उदाहरण आहे. सोशल मीडियावर धनश्रीची मोठी फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर पन्नास दशलक्षाहून अधिक लोक धनश्रीला फॉलो करतात. धनश्रीच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे डान्सचे बरेच व्हिडिओ आहेत. धनश्री एक प्रोफेशनल कोरियोग्राफर आणि फिटनेस ट्रेनर आहे.
फक्त इंस्टाग्रामच नव्हे तर धनश्री यूट्यूबवर देखील हिट ठरली आहे, जिथे धनश्रीच्या डान्सचे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ अपलोड केले गेले आहेत. धनश्री वर्मा हे गेल्या काही काळापासून लेगस्पिनर युजवेंद्र चहलशी रिलेशनशिप मध्ये आहे, पण दोघांनीही अतिशय हुशारीने हे नाते जगापासून लपवून ठेवले.
धनश्री टिकटॉकवरही खूप सक्रिय होती आणि धनश्रीने अनेक व्हिडिओ बनवले होते. युजवेंद्र चहल आणि धनश्री यांनी प्रथमच सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर केले.
आता धनश्री एका भारतीय क्रिकेटपटूची पत्नी होणार असल्याने तिची लोकप्रियता आणि फॅन फॉलोअर्सही नैसर्गिकरित्या वाढतील.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला