गावसकरांच्या मते त्यांनी खेळलेला सर्वोत्तम गोलंदाज कोण?

Andy Roberts - Sunil Gavaskar

आपण खेळलेला सर्वोत्तम जलद गोलंदाज कोण? या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी अँडी रॉबर्टस्(Andy Roberts) यांचे नाव घेतले. रॉबर्टसविरुध्द तुम्ही कधीच निवांत राहू शकत नव्हते. इतरांविरुध्द तरी तुम्हाला नवा चेंडू किंवा खेळपट्टीचे वर्तन कसे राहिल याची काळजी रहायची पण अँडी रॉबर्टसकडे असे कौशल्य होते की तो जुन्या चेंडूवरही विकेट काढायचा. त्याच्याकडे गती अशी होती आणि चेंडू दोन्ही बाजूला काढण्याची त्याची क्षमता अशी होती की फलंदाज अडचणीत यायचे. म्हणून जलद गोलंदाजात अँडी रॉबर्टस् बेस्ट असे विश्लेषण त्यांनी केले.

फिरकी गोलंदाजांमध्ये आपण खेळलेल्यांत डेरेक अंडरवूड(Derek Underwood) सर्वात अवघड होता असे ते मानतात. चेंडूला क्वचितच फ्लाईट देत वेगाने तो चेंडू सोडायचा म्हणून त्याच्याविरुध्द कायम दक्ष रहायला लागायचे असे त्यांनी सांगितले.

आपल्या उंचीबद्दल ते सागंतात की शालेय जीवनानंतर माझी उंची थोडीशीच वाढली. उंची फारशी नसल्याने गोलंदाज नेहमीच बाऊन्सर टाकून मला घाबरवायचा प्रयत्न करायचे. भारतातील संथ खेळपट्यांवर मला त्याची सवयच झाली पण जेव्हा मी वेस्ट इंडिजमध्ये गेलो तेव्हा पाहिले की गोलंदाजांचे चेंडू यष्टीरक्षकाच्या खांद्यापेक्षाही वर जात होते. म्हणून मी रणजी संघातील माझ्या सहकाºयांना नेहमीच्या २२ यार्डाऐवजी १८ यार्डाच्या अंतरावरुनच गोलंदाजी करायला सांगत सराव केला. त्याच्याने माझे पदलालित्य सुधारले, अधिक चपळाई आली.

माझ्या कारकिर्दीत मी एक गोष्ट लवकर शिकलो ती ही की, बाऊन्सरला तुम्ही धावा करण्याची संधीच समजा. जर तुम्ही ते करू शकलात तर तुम्ही चेंडूवरुन नजर कधीच हटवणार नाहीत असा मंत्र त्यांनी सांगितला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER