टिक टॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येमागील आहे तरी कोण?

राजकीय क्षेत्रात खळबळ

CM Uddhav Thackeray - Pooja Chavan - Devendra Fadnavis

मुंबई :- टिकटॉक (Tik Tok) स्टार असलेल्या  पूजा चव्हाण (Pooja Chavan) या 22 वर्षीय तरुणीने  पुण्यात केलेल्या आत्महत्येचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. विदर्भातील एका मंत्र्यांचा या आत्महत्येशी संबंध जोडला गेल्याने खळबळ उडाली आहे.

एका इमारतीवरून उडी मारून गेल्या रविवारी पूजाने आत्महत्या केली होती. पूजाशी संबंधित  विषयाच्या काही ऑडियो क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. त्यातील कथित आवाज एका मंत्र्यांचा असल्याचे म्हटले जात आहे.

या आत्महत्येची सखोल चौकशी करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. पुणे पोलिसांनी या आत्महत्येची तत्काळ चौकशी करावी आणि सत्य बाहेर आणावे असे फडणवीस पुणे येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

एखाद्या तरुणीच्या आत्महत्येमध्ये मंत्र्यांचे नाव यावे व त्यावर कारवाई होऊ नये  ही सखेद आश्चर्याची बाब असल्याचे भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले या आत्महत्येची राज्य सरकारने स्वत:हून चौकशी केली पाहिजे. तिने आत्महत्या करून तीन दिवस झाले तरी  अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार द्यायला हवी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण राज्य सरकारला स्वतःहून तक्रार दाखल करुन घेता येत नाही का? असा प्रश्न  पाटील यांनी केला.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना आव्हान दिले आहे. भातखळकर यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री ‘राठोडगिरी’ सहन करणार का? असा प्रश्न विचारला आहे.  संबंधित मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही भातखळकर यांनी केली.

पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरुणी आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या.

दोन तरूण हे काही दिवसांपासून पुजा सोबत होते त्यातील तिचा एक भाऊ आहे या दोघांकडून पोलिसांनी योग्य प्रकारे माहिती घेतली तर स्फोटक सत्य समोर येऊ शकते असे म्हटले जाते.तसेच व्हायरल होत असलेल्या ऑडियो क्लिप्स या मोठा पुरावा ठरू शकतात. संबंधित मंत्री हे विदर्भातील आहेत अशा बातम्या विविध वृत्तपत्रांनी दिल्या आहेत. पोलिसांनी त्यामुळे तीन चार मंत्री संशयाच्या घेऱ्यात आले आहेत. त्यामुळे सर्व शंकेचे वातावरण दूर व्हावे म्हणून पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा अशी भावनादेखील व्यक्त होत आहे. पूजा ही सोशल मीडियामध्ये प्रचंड लोकप्रिय होती तिथे हजारो लाखो फॉलोअर्स आहेत.

ही बातमी पण वाचा : परळीच्या तरुणीची पुण्यात आत्महत्त्या, विदर्भातील मंत्र्याचं कनेक्शन? भाजपकडून तक्रार दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER