सद्यस्थितीत मेस्सी, रोनाल्डो नाही तर कोण आहे नंबर वन फूटबॉलपटू?

राॕबर्ट लेवांडोस्कि

आजच्या घडीला जगातील सर्वोत्तम फूटबाॕलपटू कोण आहे? लियोनेल मेस्सी (Lionel Messi) ? ख्रिस्तियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) ? केव्हिन डी ब्रुईन की राॕबर्ट लेवांडोस्की (Robert Lewandowski) ?

कोरोनाने यंदा विचका केला नसता तर पोलंडचा राॕबर्टं लेवांडोस्कीनेच यंदाचा सर्वोत्तम फूटबाॕलापटूचा बॕलन डीओर पुरस्कार जिंकला असता. कारण बायर्न म्युनिकच्या या स्ट्रायकरने 2019- 20 च्या मोसमात 47 सामन्यांमध्ये 55 गोल केले होते आणि तोच फाॕर्म कायम राखत त्याने यंदा 13 गोल केलेले आहेत. त्याच्या ह्या कामगिरीने बायर्न म्युनिकला गेल्यावर्षी बुंदेसलिगा, डीएफबी पोकाल आणि चॕम्पियन्स लीग ह्या तीन स्पर्धांचे विजेते बनवले होते.

त्यामुळे यंदा कोरोनापायी त्याचा बॕलोन डी’ओर पुरस्कार हुकला असला तरी फूटबाॕलविषयक संकेतस्थळ ‘गोल’ ने केलेल्या सर्वेक्षणात तो सद्यस्थितीला जगातील सर्वोत्तम फूटबाॕलपटू बनून समोर आला आहे. गोल’चे संपादक व प्रतिनिधींनी त्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केली आहे. त्यांच्या या यादीत केव्हिन डी ब्रुईन दुसऱ्या स्थानी तर लियोनेल मेस्सी तिसऱ्या स्थानी आहे.

याशिवाय गोलने 176 देशातील सुमारे 26 हजार फूटबॉलप्रेमींमध्ये सर्वेक्षण केले. त्यातही राॕबर्ट लेवांडोस्की सर्वाधीक चाहत्यांच्या मते यंदाचा नंबर वन खैळाडू ठरला आहे.

गोल’च्या सर्वेक्षणानुसार यंदाचे टॉप टेन खेळाडू असे…

10- सादियो माने (लिव्हरपूल)
9- थाॕमस म्युलर (बायर्न म्युनिक)
8-करिम बांन्झेमा (रियाल माद्रिद)
7 – व्हर्जिल व्हॕन डायक (लिव्हरपूल)
6- कायलियन एमबाप्पे ( पॕरिस सेंट जर्मेन)
5- ख्रिस्तियानो रोनाल्डो (युवेंटस)
4- नेमार (पॕरिस सेंट जर्मेन)
3- लियोनेल मेस्सी (बार्सिलोना)
2- केव्हिन डी ब्रुईन (मँचेस्टर सिटी)
1- राॕबर्ट लेवांडोस्कि (बायर्न म्युनिक) .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER