कोण कोण खेळलंय आतापर्यंतच्या प्रत्येक आयपीएलमध्ये?

Who has played in every IPL so far

आयपीएलचे (IPL) 13 वे सत्र युएईमध्ये (UAE) रंगत आहे आणि आतापर्यंत आयपीएलच्या सर्वच्या सर्व 13 सत्रात खेळणारे केवळ 16 खेळाडू आहेत. त्यात अर्थातच पटकन आठवणारी नावे म्हणजे महेंद्रसिंग धोनी (M S Dhoni) व रोहित शर्मा (Rohit Sharma) हे यशस्वी कर्णधार आणि अजुनही पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या शोधात असलेला विराट कोहली (Virat Kohli), एबी डी’विलियर्स (AB de’Villiers) , पियुष चावला हे नेहमीचे शिलेदार.

याशिवाय या 16 विशेष खेळाडूंमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा, रवींद्र जडेजा, शिखर धवन, इशांत शर्मा, स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज अमीत मिश्रा, शेन वाॕटसन, मनिष पांडे, वृध्दिमान साहा, डेल स्टेन आणि सौरभ तिवारी.

याचाच अर्थ हे 16 खेळाडू गेल्या 13 वर्षापासून सातत्याने उच्च दर्जाचे क्रिकेट खेळत असून आपला फाॕर्म टिकवून आहेत.

या 16 खेळाडूंच्या यादीत आणखी दोन खेळाडूंची भर पडू शकते. ते म्हणजे पियुष चावला व धवल कुलकर्णी. या दोघांनाही आयपीएल 2020 मध्ये अद्याप सामना खेळायला मिळालेला नाही पण जर ते खेळले तर तेसुध्दा आतापर्यंतच्या सर्व आयपीएल खेळलेल्या या खेळाडूंच्या यादीत येतील.

सुरेश रैना व हरभजन सिंग हे यंदा खेळले असते तर तेसुध्दा या यादीत आले असते कारण या दोघांनीही आधीचे सर्व 12 आयपीएल सत्र खेळले आहेत. या दोघांशिवाय युसुफ पठाणनेही आधीची सर्व 12 सत्र खेळली आहेत.

ही यादी पाहिली तर लक्षात येईल की यापैकी महेंद्रसिंग धोनी व रोहित शर्मा हे दोघेच विजयी कर्णधारसुध्दा आहेत तर विराट कोहली हा एकमेव असा खेळाडू आहे जो एवढ्या साऱ्या आयपीएल एकाच संघासाठी खेळला आहे. यापैकी इशांत शर्मा, दिनेश कार्तिक व पार्थिव पटेल हे प्रत्येकी सहा वेगवेगळ्या संघांसाठी खेळले आहेत. 2010 पासून आयपीएलमध्ये खेळणारा आरोन फिंच हा सर्वाधिक आठ संघांसाठी खेळला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER