जाणून घ्या आयपीएल २०२१ साठी कुणी कुणाला दिली सोडचिठ्ठी?

Sports

स्टीव्ह स्मीथ (Steve Smith), उमेश यादव (Umesh Yadav), कोल्टर नाईल (Coulter Nile), आरोन फिंच (Aaron Finch), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), टॉम करन (Tom Karan), पियुष चावला (Piyush Chawla), तुषार देशपांडे (Tushar Deshpande), जेसन रॉय (Jason Roy), करुण नायर (Karun Nair), शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell), मलिंगा (Malinga), पॅटीसन (Pattison), शिवम दुबे (Shivam Dubey) यांच्यासोबत संघांनी घेतली फारकत

आयपीएल २०२१ ( ipl 2021) साठी राजस्थान रॉयल्सने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मीथसारख्या (Steve Smith) कसलेल्या फलंदाजाला सोडचिठ्ठी दिली असून आगामी सत्रासाठी संजू सॅमसन ( Sanju Samson) हा रॉयल्सचा नवा कर्णधार असेल असे जाहीर केले आहे. आयपीएल २०२१ साठी कायम राखण्याचे खेळाडू आणि सोडायचे खेळाडू हे जाहीर करण्याची आज शेवटची मुदत होती. त्यानुसार संघांनी आपआपल्या संघबांधणीसाठीचे बदल जाहीर केले आहेत. त्यात स्टीव्ह स्मिथला सोडचिठ्ठी देण्याचा राजस्थान रॉयल्सचा निर्णय धक्कादायक मानला जात आहे. बुहतेक सर्व संघांनी बदल केले असले तरी सनरायजर्स हैदराबादने २२ खेळाडू कायम ठेवले आहेत.

राजस्थान रॉयल्सने स्टीव्ह स्मीथसोबतच अंकित राजपूत, ओशान थॉमस, आकाश सिंग, वरुण आरोन, टॉम करन, अनिरुध्द जोशी आणि शशांक सिंग यांनासुध्दा मुक्त केले आहे.

आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या निराशाजनक कामगिरीत केदार जाधव टीकेचे लक्ष ठरला होता. अपेक्षेप्रमाणे सीएसकेने त्याला मुक्त केले आहे. त्यासोबतच निवृत्त झालेला शेन वॉटसनसह हरभजन सिंग, पियुष चावला, मुरली विजय व मोनू सिंग यांनासुद्धा सीएसकेने मुक्त केले आहे. मात्र सुरेश रैना कायम आहे.

कोलकाता नाईट रायडर्स दिनेश कार्तीकला सोडणार असल्याची चर्चा असली प्रत्यक्षात तसे घडलेले नाही. मुळात केकेआरने फारसे बदल केलेले नाही. त्यांनी मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये टॉम बँटन, ख्रीस ग्रीन, निखील नाईक, एम. सिध्दार्थ व सिध्देश लाड यांचा समावेश आहे.

आयपीएल २०२० मध्ये चमक दाखविल्यावरही दिल्ली कॅपिटल्सने तुषार देशपांडेला मुक्त केले आहे. त्याच्यासोबत मोहित शर्मा, किमो पॉल, संदीप लामीछेन, अॅलेक्स कॅरी व जेसन रॉय हेसुद्धा आता इतर संघांसाठी उपलब्ध असतील.

ग्लेन मॅक्सवेलला किंग्ज इलेव्हन पंजाबने अपेक्षेप्रमाणे डच्चू दिला आहे. करुण नायर, हार्दूस व्हिलोयेन, जगदीश सुचीथ, मुजीब उर रहमान, सॅल्युटसाठी प्रसिध्दी पावलेला शेल्डन कोट्रेल, जिमी निशॅम, क.गौतम व ताजिंदरसिंग हेसुद्धा आता किंग्ज इलेव्हनच्या तंबूत नसतील.

मुंबई इंडियन्सने परदेशी गोलंदाज लसीथ मलिंगा, कोल्टर नाईल, मॅक्लेघलन, जेम्स पॅटीसन यांच्यासह हमीश रुदरफोर्ड, प्रिन्स बलवंत व दिग्विजय यांना मुक्त केले आहे.

सनरायजर्सने मोजकेच बदल करताना संजय यादव, संदीप भावंका, बीली स्टॅनलेक, फेबियन ॲलन व यारा पृथ्वीराज यांना मुक्त केले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आरोन फिंच, ख्रीस मॉरीस, मोईन अली, उमेश यादव, पवन नेगी, गुरुकिरत मान, शिवम दुबे व उसुरू उदानासारख्या चांगल्या खेळाडूंना मुक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER