उद्धव ठाकरे यांनी नेमके मुख्यमंत्री कोण आहेत? हे जाहीर करावे : प्रकाश आंबेडकर

CM Uddhav Thackeray & Prakash Ambedkar

कोल्हापूर : सरकारमध्ये निर्णय कोण घेतयं, हे समजत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नेमके मुख्यमंत्री कोण आहेत? हे जाहीर करावे. महाविकास आघाडीत गोंधळ सुरु आहे. मुख्यमंत्री कोण हेच त्यांना अजून कळत नाही. असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज कोल्हापूरात लगावला. मराठा आरक्षणावरुन राज्यात राजकारण सुरु आहे. ज्या घराण्यांनी आजपर्यंत सत्ता भोगली, त्या मराठा नेत्यांची आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची इच्छा नाही. त्यामुळे हे श्रीमंत मराठे गरीब मराठ्यांना जगू देणार नाहीत, असा आरोपही आंबेडकर यांनी केला. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ते आज कोल्हापुरात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यावर आम्ही आजही ठाम आहोत. मात्र या प्रश्नावर मराठा नेतेच राजकारण करत आहेत. राज्याची सत्ता उपभोगून मोठे झालेल्या मराठा नेत्यांना गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचे काहीही देणेघणे नाही. हा प्रश्न जितका लांबवता येईल, तितका लांबवला जात आहे. असा आरोप करीत प्रकरण न्यायालयात प्रलंबित असले, तरी जाहीर केलेल्या योजनांचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना तात्काळ देण्यात यावा.

घरगुती वीज बिल माफ करा

घरगुती वीज बिल माफ करण्यास सरकारला अडचण काय आहे. केवळ अडीच हजार कोटींची गरज आहे. सरकारने तात्काळ घोषणा करावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER