जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख कोरोनाबाधिताच्या संपर्कात, स्वत: झाले क्वॉरन्टाईन

Tedros Adhanom

मुंबई : जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. याचदरम्यान, आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस (Tedros-adhanom ghebreyesu) यांनी स्वत: क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मी अशा व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो, ज्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, असं टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी सांगितलं आहे.

टेड्रॉस यांनी ट्विटरवरुन यांनी ही माहिती दिली. त्यांनी ट्वीट केलं आहे की, मी अशा व्यक्तीच्या संपर्कात आहे, ज्याची कोविड-१९ च्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व माझ्यामध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे मी पुढील काही दिवसांसाठी सेल्फ क्वारंटाईनमध्ये असणार आहे व घरूनच काम करणार आहे.

त्यांनी पुढे लिहिलं आहे की,आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. असं केले तरच आपण कोरोना संसर्गाची ही साखळी तोडू शकतो व कोरोनावर मात करू शकतो. तसेच आरोग्य प्रणालीचे रक्षणही करू शकणार आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER