राहुल गांधी आणि अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याने राज्यातील काॅंग्रेस नेते सैरभैर

Rahul gandhi

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राज्यात काॅंग्रेस-राष्ट्रवादी पक्षालाही उतरती कळा लागली. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. तेथेही विजयदादा मोहीते पाटील यांच्यामुळे आता अनेकांना भाजपाचे वारे लागलेत. तर काॅंगसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानं आमचा कोणी वाली नाही असे काॅंग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.

या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याने कॉंग्रेसचे नेते सैरभैर झाले आहे. कोणी भाजपात तर कोणी शिवसेनेत जाण्यास उतावीळ होत आहे.तर, दुसरीकडे भाजपचे डावपेच यशस्वी होत असून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सोलापूर अक्षरशः उध्वस्त झाला आहे. जिल्हाभर पारा-पारावर सध्या फक्त कोणता नेता भाजपमध्ये जाणार आणि कोणता नेता सेनेत जाणार याचेच अंदाज बांधत खमंग चर्चा सुरु झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला माढ्याची मोहीम फत्ते केल्याने तसेच मोहिते-पाटलांच्या रूपाने भाजपला खंदा शिलेदार सोलापूर ग्रामीणमध्ये मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांना आभाळ देखील ठेंगणे वाटू लागले आहे.

अक्कलकोट- काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे भाजप किंवा शिवसेनेत जाणार.
बार्शी- राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत.
माढा- राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे भाजपात जाणार अशी माहिती आहे.
पंढरपुर-काँग्रेसचे आमदार भारत भालके भाजप किंवा शिवसेनेत जाणार अशी चर्चा सोलापुरात पारावर आहे.

ही बातमी पण वाचा : निलेश राणेंनी उपअभियंत्याला पुलावर बांधून त्याच्यावर चिखल ओतला