बंद पडलेल्या मॉलमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात कुणाचा फायदा होता? मनसेचा टोमणा

Uddhav Thackeray & Raj Thackeray

मुंबई : भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री १२ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या मॉलमध्ये ‘सनराईज’ हे कोव्हिड रुग्णालय आहे. या आगीत १० रुग्णांचा मृत्यू झाला. बंद पडलेल्या मॉलमध्ये कोविडसेंटर सुरू करण्यात कुणाचा फायदा होता? कोरोनाच्या काळात पैसे उकळण्यासाठी या रुग्णालयाला परवानगी दिली होती का, असा टोमणा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला मारला.

या प्रकरणी स्थानिक अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे. प्रशासन फक्त नावाला चौकशी करते, पुढे काहीच येत नाही, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे ठाकरे म्हणालेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनीही या घटनेबाबत सरकारवर आणि पालिकेवर टीका केली. रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असा दावा करणाऱ्यांना आधी तुरुंगात टाका. रुग्णांच्या मृत्यूसाठी मॉलच्या मालकांना जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER