कोण आहेत सर्वांत कमी वयाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू?

Nia Greig & Marian Gherasim

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने  (आयसीसी)  किमान १५ वर्षे वय असेल तरच कुणालाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येईल, असा नियम केला आहे. अपवादात्मक परिस्थितीत संबंधित मंडळाने आयसीसीकडे परवानगी मागितली आणि ती मिळाली तरच यापेक्षा कमी वयाचा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार आहे.

यामुळे दोन खेळाडूंच्या नावावरील सर्वांत  कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट (Cricket) खेळायचा विक्रम जवळपास सुरक्षित झाला आहे. ते खेळाडू म्हणजे जर्सी (Jersey) संघाची खेळाडू निया ग्रेग (Nia Greig) व रुमानियन (Romania) संघाचा मेरियन घेरासीम (Marian Gherasim) हे दोन्ही खेळाडू अतिशय कमी वयात टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळले आहेत.

निया ग्रेग ही जुलै २०१९ मध्ये फ्रान्सविरुद्ध  टी-२० सामना खेळली तेव्हा तिचे वय फक्त ११ वर्षे ४० दिवस होते आणि घेरासीम हा यंदाच अॉक्टोबरमध्ये बल्गेरियाविरुद्ध  खेळला तेव्हा त्याचे वय १४ वर्षे १६ दिवस होते. आजच्या घडीला हे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकले नसते; पण त्यांच्या सुदैवाने नियम नंतर बनला आणि आता त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात बहुधा नेहमीसाठी सर्वांत  कमी वयाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून त्यांची नोंद राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER