टुकडे टुकडे गँग असो की, पालघरमधील खूनी, यांना शरण देणारे कोण आहेत? फडणवीसांचा सवाल

Devendra Fadnavis

मुंबई :- रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना आज रायगड पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेवरून राज्यात पुन्हा एकदा ठाकरे सरकार विरुद्ध विरोधक असा वाद उभा राहताना दिसत आहे. अन्वय नाईक प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडेच उत्तर मागितलं आहे.

अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख होता. या प्रकरणी रायगड पोलिसांनी आज अर्णब गोस्वामी यांना अटक केली.

या अटकेवरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत काँग्रेसवर टीकेची तोफ डागली आहे. जातीय हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कटाचा भांडाफोड केल्याची शिक्षा अर्णब गोस्वामी यांना भोगावी लागत आहे. टुकडे टुकडे गँग असो की, पालघरमधील खूनी, यांना शरण देणारे कोण आहेत? याचं उत्तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे देश मागत आहे. त्याच काँग्रेसच्या इशाऱ्यांवर नाचणारं कुमकुवत सरकार महाराष्ट्राला आणीबाणीच्या दिशेनं घेऊन जात आहे. माध्यमांच्या अभिव्यक्तीविषयी बोलणारे आता कुठे लपून बसले आहेत? आज सगळे दुतोंडी चेहरे उघडे पडले आहेत,” अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

स्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख होता. या प्रकरणी रायगड पोलिसांनी आज अर्णब गोस्वामी यांना अटक केली.

ही बातमी पण वाचा : शिवसेना आणि काँग्रेसकडून आणीबाणीच्या मानसिकतेचे प्रदर्शन : देवेंद्र  फडणवीस 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER