‘व्हाइट हाऊस उंदीर मारण्याच्या औषधाने सॅनिटाइझ करावे लागणार !’ राम गोपाल वर्मा यांचे ट्विट

ram gopal verma

मुंबई : राम गोपाल वर्मा यांनी जो बायडन यांच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. ‘मला डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराजयाने आनंद झाला आहे. तेथील लोकांना व्हाइट हाऊस सुरक्षित ठेवण्यासाठी उंदीर मारण्याच्या औषधाचा वापर करून सॅनिटाइझ करावे लागणार’ असे ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे. यातून वर्मा यांचा ट्रम्प यांच्याबद्दलचा राग व्यक्त होतो.

चार दिवसांपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे जगाचे लक्ष होते. बायडन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले. बायडन यांना ५०.५ टक्के म्हणजे ७,४४,७८,३४५, तर ट्रम्प यांना ४७.७ टक्के म्हणजे ७,०३,२९,९७० मते मिळाली आहेत. पेनसिल्वेनियात अखेर बायडन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले. तेथील २० प्रातिनिधिक मते त्यांनी मिळविली. नॉर्थ कॅरोलिनात ट्रम्प, तर अ‍ॅरिझोना, नेवाडात बायडन विजयी झालेत.

कमला हॅरिस यांनी इतिहास घडवला आहे. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष झाल्या आहेत. तसेच त्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकी-अमेरिकी उपाध्यक्ष आहेत. बायडन आणि हॅरिस यांचा शपथविधी २० जानेवारीला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER