घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्री भूमिपूजन सोहळ्याला; भाजपचा टोला

atul bhatkhalkar & Uddhav Thackeray

मुंबई : मुंबईतील वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहरात कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची माहिती तर त्यांनी दिलीच; पण नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या निष्काळजीपणावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा (Corona) धोका वाढत असल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान आता भाजपाचे (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी महापौरांच्या विधानांवरून मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला आहे.

घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला? असं म्हणत अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा, असं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button