नाणार प्रकल्पाला सेनेचा विरोध तर, राष्ट्रवादीचे समर्थन, आता लक्ष पवारांच्या भूमिकेकडे

रत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्पाला (Nanar project) शरद पवारांनी विरोध केलेला नव्हता. संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर सविस्तर मुद्दा मांडला गेला, तर प्रकल्पासाठी सकारात्मक निर्णय होऊ शकेल. त्यासाठी दोघांचीही भेट घालून देण्याची जबाबदारी मी घेतो, असे आश्‍वासन देतानाच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रकल्पाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध नसल्याचे रिफायनरी समर्थकांना स्पष्ट केले. त्यामुळे आता शिवसेनेचा विरोध झुगारून पावर कुठली घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांच्यासह अविनाश महाजन, विद्याधर राणे, जुनेद मुल्ला, सचिन आंबेरकर, नीलेश पाटणकर, केशव भट, आनंद जोशी, प्रमोद खेडेकर, सचिन शिंदे यांनी नुकताच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री पाटील यांची भेट घेतली. या प्रसंगी क्रेडाईतर्फे दीपक साळवी व राजेश शेट्ये यांनीही रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी निवेदन दिले. राजापूर तालुक्‍यातील प्रस्तावित रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर समर्थन वाढले आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न व्हावेत आणि या प्रकल्पाची अधिसूचना पुन्हा काढली जावी, अशी मागणी त्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

रिफायनरी प्रकल्पासाठी स्थानिकांनी संमती दिली आहे. जवळपास साडेआठ हजार एकर जमीन मालकांनी जागा देण्यासाठी संमतीपत्रे दिली आहेत. ती मंत्री पाटील यांच्यापुढे सादर करण्यात आली. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचे अर्थकारण बदलणार असून तो लवकरात लवकर मार्गी लावावा. सरकारमधील अधिकृत नेत्यांनी जाहीर केलेली भूमिका “जिथे जमीन द्यायला तयार होतील, तिथे आम्ही प्रकल्प करायला तयार आहोत’ अशी आहे. नाणार’साठी जमीन देणाऱ्यांच्या संमतीचाही विचार करावा. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घडवून द्यावी, अशी मागणीही या नाणार प्रकल्पाच्या समर्थकांनी केली. त्यावर शरद पवार यांनी कधीही प्रकल्पास विरोध केलेला नाही. प्रकल्पाचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. त्यांची वेळ घेतल्यानंतर कुमार शेट्ये, अजित यशवंतराव यांच्यामार्फत निरोप देतो, असे जयंत पाटील या वेळी म्हणाले.

ही बातमी पण वाचा : शिक्षक, पदवीधर निवडणूक: महाविकासआघाडीतील पक्ष स्वबळाच्या तयारीत?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER