यु-टर्न घेत संजय राऊत म्हणाले, किरीट सोमय्या यांना शिवसेनेचा विरोधच नव्हता

Sanjay Raut

नाशिक :- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यानी यु-टर्न घेत म्हटले आहे कि भाजप खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचा विरोधच नव्हता. शिवसेनेच्या विरोधामुळेच भाजपने सोमय्याची उमेदवारी नाकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र सोमय्यांची उमेदवारी हा भाजपचा अंतर्गत मुद्दा असल्याचे राऊत नाशिकमध्ये म्हणाले.

सोमय्या यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारात सहभागी होऊ नये, ही शिवसैनिकांची भावना असली तरी ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचेदेखील राऊत यांनी सांगितले. विशेष म्हणजे राऊत यांनी वेळोवेळी सोमय्यांच्या उमेदवारीविरोधात भूमिका घेतली होती. राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांनी सोमय्यांविरोधात अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचंही संजय राऊत यांनीही समर्थन केले होते.

पक्षप्रमुखांबद्दल ज्या प्रकारची वक्तव्ये केली, ती योग्य नव्हती. टीका करण्यास हरकत नाही, पण आपण कोणत्या भाषेचा वापर करता याचाही विचार करायला हवा होता. कोणत्या मर्यादेपर्यंत टीका करावी हे आधीच ठरवलं पाहिजे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना  त्यांनी भरपूर त्रास दिला. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना शांत केले आहे. आता जो निर्णय घ्यायचा आहे तो भाजपाचे दिल्लीतील नेते घेतील,’ असे संजय राऊत यांनी 29 मार्च रोजी म्हटले होते.