दिल्लीत दंगल झाली त्यावेळी पोलिस रस्त्यावर झुंजत होते : अमित शाह

नवी दिल्ली :- दिल्लीतील दंगलींवरून राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 25 तारखेनंतर एकही हिंसाचाराची घटना झालेली नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली हिंसाचारावरून आज लोकसभेत गोंधळ घालणा-या विरोधी पक्षांना उत्तर दिले. असुदुद्दील ओवैसी, अधीररंजन चौधरी आदींनी केंद्र सरकारवर दंगलीबद्दल सरकारला जबाबदार धरून अनेक प्रश्न उपस्थित केले. दिल्लीतील हिंसाचार माजला त्यावेळी पोलिस काय करत होते. असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला.

दिल्लीत एका मोठ्या पक्षाची रॅली झाली. त्यामध्ये घोषणा दिल्या गेल्या. घर से बाहर निकलो. यह आर या पार की लडाई है… हे तुम्हाला भडकावू भाषण वाटत नाही का? असा सवाल अमित शाह यांनी उपस्थित करत विरोधकांवर निशाणा साधला. पोलिसांवर टीका करणाऱ्यांना मला हे सांगायचे आहे की, दंगल भडकत होती, त्यावेळी पोलीस रस्त्यावर झुंजत होते. त्यांचे काम अजून संपलेले नाही. सत्य कोर्टासमोर ठेवायचे आहे. त्यासाठी ते पुरावे गोळा करत आहेत. त्यामुळे टीका करताना विरोधकांनी वास्तवाचं भान राखायला हवे, असे शाह म्हणाले.


Web Title : While riots in Delhi police were fighting on street : Amit Shah

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)