वाजपेयींनी राष्ट्रपतीपदाची ऑफर नाकारताना कांशीराम म्हणाले होते…

Maharashtra Today

‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागेदारी’ ही घोषणा कांशीराम (Kanshi Ram) यांची. त्यांनी उत्तर प्रदेशसह देशभरातल्या राजकारणात दलितांना सत्तास्थानी पोहचवलं. या प्रवासात त्यांच्या समोर अनेक प्रस्ताव ठेवण्यात आले. त्यापैकी एक किस्सा जो आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहिती नसेल. भाजप(BJP) आणि बसप या परस्परविरोधी टोकाची विचारधारा असणारे पक्ष. भारतीय जनता पार्टीचे बडे नेते तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee)यांनी बहूजन समाज पार्टीचे (BSP)संस्थापक कांशीराम यांना राष्ट्रपती पदाची ऑफर दिली होती. हा प्रस्ताव नाकारत ते म्हणाले होते की, “मला राष्ट्रपती नाही पंतप्रधान पद हवं आहे.” ( Vajpayee’s offer for the presidency, Kanshi Ram )

हा किस्सा बऱ्याचदा चर्चला गेला आहे. पण वाजपेयींना कांशीराम राष्ट्रपती म्हणून का हवे होते? याचा सवाल कुणी विचारत नाही. राजकारणात विरोधकाला प्रसन्न करणं हा त्याला कमजोर करण्याचा प्रयत्न असतो. वाजपेयी राजकारणाचा हा नियम शिताफिन वापरत असतील ही. परंतू जाणकारांच्या मते कांशीराम यांना पुर्णपणे समजण्यात वाजपेयींनी चुक केल होती. त्यांना कांशीरामांबद्दल पुर्ण परिकल्पना असती तर त्यांनी कधीच हा प्रस्ताव कांशीराम यांच्यासमोर ठेवला नसता.

वाजपेयींचा प्रस्ताव नाकारणाऱ्या कांशीराम यांची ही कृती त्यांच्या आयुष्याचे ध्येय अधोरेखित करते. वर्षानूवर्षे गुलामी करणाऱ्या दलित समुदायाला सत्तास्थानी पोहचवणं त्यांच ध्येय होतं. दलितांना ‘फर्स्ट अमंग्स द इक्वल्स’ बनवनं. मायवतींच्या माध्यमातून त्यांनी ही गोष्ट करुन दाखवली. त्यांच्यावर नेहमी आरोप करण्यात आले की कोणत्याच आघाडीशी ते प्रामाणिक राहीले नाहीत. त्यांनी कॉंग्रेस, भाजप आणि समाजवादी पार्टीसोबत आघाडी केली. स्वतःच्या ध्येय धोरणां पायी त्यांनी या आघाड्या घडवून आणल्या. याबद्दल टिकाकारांनी नेहमी त्यांच्यावर टीका केली. कांशीराम यांनी या आरोपांवर एका मुलाखतीत उत्तर देताना म्हणलं होतं, “मी त्यांना (राजकीय पक्षांना) खुश करण्यासाठी राजकारण करत नाहीये.’

राजकीय आणि सामाजिक संघर्षावेळी कांशीराम यांनी ब्राम्हणवादाशी संबंधीत प्रत्येक गोष्टीचा विरोध केला. मग ते महात्मा गांधी असतो की राजकीय पार्टी की माध्यमं की दलित नेते त्यांना कांशीराम ‘चमचा’ म्हणायचे. दलितांच्या स्वातंत्रता संघर्षाला किनार देऊन पहिल्यापासूनच भाजप आणि कॉंग्रेसचे मंडलीक झालेले नेते चमचे आहेत असे ते वारंवार सांगायचे.

चमचाचा उपयोग

कांशीराम मानायचे की जेव्हा जेव्हा दलित संघर्ष मनुवादाला अभुतपुर्ण आव्हान द्यायचा तेव्हा ब्राम्हण वर्चस्व असणारे राजकीय पक्ष, ज्यात कॉंग्रेसही सामील आहे, त्यांनी दलित नेत्यांना हाताशी धरुन आंदोलन कमजोर करण्यात धन्यता मानली. जेव्हा ही कोणती लढाई, संघर्ष, योद्धांकडून या पक्षांना धोका नसतो तेव्हा त्यांना चमच्यांची गरज भासत नाही. परंतू नंतर जेव्हा दलित वर्गाला खऱ्या सशक्त आणि प्रबळ नेतृत्त्व लाभत तेव्हा या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये चमच्यांची चलती असते.

जीवन

१९५८ साली कांशीराम यांनी पुण्यातून पदवीचं शिक्षण घेत ‘डीआरडीओ’मधून सहाय्यक वैज्ञानिकाच काम केलं. या दरम्यान आंबेडकर जयंतीला सार्वजनिक सुट्टीच्या मुद्द्यावरुन झालेल्या संघर्षामुळं त्यांचं मन परिवर्तन झालं. पुढं संपूर्ण आयुष्य दलितांना राजकीय आणि सामाजिक स्थान देण्यासाठी त्यांनी खर्ची घातलं. त्यांचे सहयोगी डी.के. खरपडे यांच्यासोबत मिळून सरकारी नोकरीला लागलेल्या दलितांची मजबूत संघटना बांधली नाव दिलं ‘बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लोयीज फेडरेशन’ म्हणजेच बामसेफ. पुढं चालून सातत्याच्या संघर्षातून त्यांनी मायावतींना उत्तर प्रदेशच्या खुर्चीवर मुख्यमंत्री म्हणून बसवलं.

या प्रवासात लाखो लोकांना त्यांनी एकत्रित केलं. शेकडो किलोमीटर त्यांनी सायकलवरुन प्रवास केला. त्यांच्या आयुष्यात असे ही संघर्ष आले की त्यांनी फाटके कपडे घालून दलितांचं नेतृत्त्व केलं परंतू माघार घेतली नाही. निळ्या किंवा पांढऱ्या शर्टा शिवाय इतर रंगाचे कापड त्यांनी संपूर्ण आयुष्यात क्वचितच परिधान केलं असेल. ९० च्या दशकात कांशीराम यांची अवस्था बिघडायला लागली. त्यांना मधूमेह आणि रक्तदाबासारख्या समस्या होऊ लागल्या. १९९४ ला त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला. २००३ला ब्रेन स्ट्रोक आणि २००६ साली हृदयविकाराच्या झटक्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. भारतातल्या दलित राजकारणाला त्यांनी सत्तेपर्यंत पोहवण्याच काम केलं.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button