राजकारण करता करता मनसेचे जिल्हाध्यक्ष दातीर बनले ‘दिलीपभाई बीए’

Maharashtra Today

नाशिक : राजकारण करता करता शिक्षण घेणे मोठं मोठ्या नेत्यानांही जमत नाही हि खरी वस्तुस्थिती आहे. शिक्षण आणि राजकारण यांचा संबंध काय? या प्रश्नाचे थेट उत्तर कोणताही नेता देऊ शकत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित नेतेमंडळी आपल्याला बोटावर मोजण्याइतकेच दिसून येतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर( Dilip Datir) हे त्याला अपवाद ठरले आहे. त्यांची शिक्षणाप्रती असलेली आवड फळाला आली आहे. राजकारणात आल्यानंतरही त्यांनी अभ्यासाचा ध्यास न सोडता बारावीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

मनसेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी राज्यशास्त्र या विषयात पदवी मिळवल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरावरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दिलीप दातीर यांनी राजकारण करता करता जिद्द व मेहनतीच्या बळावर पदवीपर्यंतचे शिक्षणदेखील पूर्ण केले आहे. बुधवारी त्यांनr पदवी संपादन केल्याची आनंदाची बातमी मिळाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले. त्यांनी केवळ पदवी पास केली नसून फर्स्ट क्लास विथ डस्टिंक्शन मिळविले आहे.

घरामध्ये सात बहिणी आणि मी एकुलता एक मुलगा असल्याने व्यवसायाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली. त्यामुळे बारावीनंतरचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. राजकारणात प्रवेश केल्यानंतर पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. जोमाने व चिकाटीने अभ्यास केला व यशस्वी झालो. यापुढे शिक्षण सुरूच ठेवणार आहे, अशी माहिती दिलीप दातीर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button