एमपीएससी परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

नवी दिल्ली :- एमपीएससी परीक्षाबाबत (MPSC Exam) तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित ८५ टक्के जनतेचे काय? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा संघटनांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यावरुन प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे.

वारकरी संप्रदायाने सरकारच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे राज्यात मंदिरे उघडी केली जात नाहीत. सरकार वारकऱ्यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहे असे दिसते, असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER