पाठलागात एकदाही विजयासाठी दोनशे धावा करू न शकलेला संघ कोणता?

SRH - Maharashtra Today

आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) नावावर बरेच विक्रम असले तरी आतापर्यंत 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग ते एकदाही करू शकलेले नव्हते. आधीच्या अशा सातही सामन्यांमध्ये ते अपयशी ठरले होते पण आठव्या प्रयत्नात शनिवारी यशस्वी ठरले जेंव्हा त्यांनी 6 बाद 219 धावा करत चेन्नई सुपर किंग्जवर (CSK) अगदी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.

त्यामुळे आता आयपीएलमध्ये बहुतेक सर्व संघांनी किमान एकदा तरी 200 पेक्षा अधिक धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आहे. पण अजुनही एक संघ असा आहे ज्याला अजुनपर्यंत एकदासुध्दा दोनशेपेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही. तो संघ म्हणजे सनरायझर्स हैदराबाद (SRH) !

दोनशेपेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन व चेन्नई सुपर किंग्जने सर्वाधिक तीन विजय नोंदवले आहेत. राजस्थान राॕयल्स व कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर असे दोन विजय आहेत तर दिल्ली कॕपिटल्स, रॉयल चॕलेंजर्स बंगलोर आणि आता मुंबई इंडियन्सने असा प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. मात्र सनरायझर्सला असा पाठलागात दोनशेच्यावर धावा करुन एकही सामना जिंकता आलेला नाही.

पाच सामन्यात सनरायझर्सला विजयासाठी दोनशेच्यावर धावांचे आव्हान मिळाले पण हे पाचही सामने त्यांनी गमावले आहेत. अर्थात एक सामना अपवाद आहे ज्यात त्यांना विजयासाठी 199 धावा करायच्या होत्या पण त्यांनी 5 बाद, 201 धावा केल्या होत्या. 2019 चा हैदराबाद येथील राजस्थानविरुध्दचा हा सामना होता आणि आणखी एकदा 2018 मध्ये त्यांनी आरसीबीविरुध्द पाठलागात त्यांनी 3 बाद 204 धावा केल्या होत्या तरी सामना गमावला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button