चंद्रकांत पाटलांना माझा कोणता पुतण्या सापडला : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal-Chandrakant Patil

मुंबई :- पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ममता बॅनर्जी यांना ‘झाशीची राणी’ म्हणून संबोधले. या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भुजबळांवर संताप व्यक्त केला. छगन भुजबळ यांनीही आता चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) प्रत्युत्तर दिले.

चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ जामीनवर सुटले आहेत. निर्दोष असल्याचे अद्यापही सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे जोरात बोलू नका, अन्यथा महागात पडेल, अशी धमकी पाटलांनी दिली. चंद्रकांत पाटलांच्या या धमकीवर भुजबळांनीही प्रत्युत्तर दिले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांना दुर्दैवाने वारंवार पराभवाचे फटके बसणार आहेत. त्यामुळे पाटलांनी पराभव सहन करण्याची शक्ती ठेवली पाहिजे. त्यांनी थोडे सांभाळून बोलले पाहिजे.”

भुजबळ यांचा पुतण्या जामिनसाठी बाजू मांडत होता, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ‘समीर भुजबळला माझ्या दोन महिन्यांपूर्वी जेलमध्ये टाकले होते. मग तो कसा जाईल यांच्याकडे? तसेच, माझ्या मुलालाही समन्स बजावल्याने तोही कधी त्यांच्याकडे गेला नाही. मग यांनी कोणता पुतण्या शोधून काढला?’ असा सवाल छगन भुजबळांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button