मेस्सीची कोणती गोष्ट रोनाल्डोला हवीहवीशी वाटते?

Christiano Ronaldo-Lionel Messi

ख्रिस्तियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) याने अलीकडेच गोलांचे शतक पूर्ण केले. त्याचा निकटचा प्रतिस्पर्धी लियोनेल मेस्सीशी (Lionel Messi) तुलना केली तर आंतरराष्ट्रीय गोलांच्या (international goals) बाबतीत बऱ्याच पुढे आहे. रोनाल्डोचे १०१ आंतरराष्ट्रीय गोल आहेत तर मेस्सीचे फक्त ७० आंतरराष्ट्रीय गोल आहेत.असे असले तरी मेस्सीची एक गोष्ट आहे जी रोनाल्डोला वाटते की, ही बाब माझ्याकडे असती तर किती बरे झाले असते! पण अशी काय गोष्ट आहे जी मेस्सीकडे आहे ती रोनाल्डो कडे नाही? तर रोनाल्डो म्हणतो की, मेस्सीच्या डाव्या पायासारखा माझा पाय असता तर किती बरे झाले असते! रोनाल्डो ३५ आणि मेस्सी ३३ वर्षांचा आहे. हे दोन्ही फुटबॉलपटू जगतातील दोन सर्वोत्तम खेळाडू मानले जातात.

ही बातमी पण वाचा:- शेन वॉर्न म्हणतो, टी-20मध्ये गोलंदाजांना पाच षटके द्या!

या दोघांचेही कौशल्य वादातीत आहे. विशेष म्हणजे हे दोघे एकमेकांचे कौशल्य व त्यातील दुसऱ्याचे श्रेष्ठत्व मान्य करतात. २०१५ च्या बॅलोन डी ओर पुरस्कार समारंभावेळी मेस्सीने रोनाल्डोचे कौतुक करताना म्हटले होते की, रोनाल्डोकडे बरेच असे गुण आहेत की, जे इतर खेळाडूंना हवेहवेसे वाटतील; पण मी माझ्यासारखा आहे आणि तो त्याच्यासारखा !रोनाल्डोनेही मेस्सीच्या गुणांबद्दल मनमोकळेपणे म्हटले आहे की, त्याच्या डाव्या पायाचे कौशल्य घेण्यासारखे आहे. त्याच्या तुलनेत मी डाव्या पायाचा तेवढा प्रभावी वापर करत नाही.

ब्राझीलच्या नेमारने तर मला दोघांचेही पाय घ्यायला आवडतील. मेस्सीचा डावा आणि रोनाल्डोचा उजवा, असे म्हटले आहे. मेस्सी व रोनाल्डोची स्पर्धा असली तरी त्यांचे संबंध चांगले आहेत. म्हणून रोनाल्डोने मेस्सीसोबत कधी तरी सोबत जेवणाची इच्छासुद्धा व्यक्त केली आहे. आतापर्यंत असा योग आलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER