आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत कोणत्या फलंदाजांनी सर्वाधिक लांब षटकार मारला आहेत?

Jofra Archer - Shane Watson

सीएसके (CSK) सलामीवीर शेन वॉटसनने रविवारी आयपीएल २०२० मधील आतापर्यंतचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा षटकार ठोकला. केएक्सआयपी लेगस्पिनर रवी बिश्नोईविरुद्ध त्याने मारलेला षटकार 101 मीटरच्या अंतरावर पोहोचला. आरआर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत सर्वात मोठे षटकार (105 मीटर) मारले आहेत. केसीआयपी(KXIP) विरुद्ध डीसी(DC) कॅप्टन श्रेयस अय्यरचा 99 मीटर षटकार हा सध्या भारतीयांमध्ये सर्वात मोठा आहे.

आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात सर्वात मोठा षटकार नोंदवण्याचा विक्रम अ‍ॅल्बी मॉर्केलने आयपीएलच्या उद्घाटन स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असताना केला आहे जो आजही कायम आहे. अ‍ॅल्बीचा 125 मीटरचा षटकार हा आतापर्यंतच्या आयपीएलमधील सर्वात लांब षटकार आहे. टेबलमध्ये दुसर्‍या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर अ‍ॅडम गिलक्रिस्टचा १२२ मीटर लांबीचा आहे जो त्याने २०११ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना मारला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER