
नवी दिल्ली : नव्याने करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांसह प्रस्तावित वीज बिल विधेयकाविरोधात शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधातआंदोलनाला सुरूवात केली आहे. मागील एका महिन्यापासून हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. कृषी कायदे मागे घेण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र, सरकार दुरुस्तीसाठी तयारी दर्शवताना दिसत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज चर्चेची सातवी फेरी सुरू आहे. या बैठकीतही शेतकऱ्यांनी केंद्राकडे पुन्हा तोच प्रश्न उपस्थित केला आहे.
शेतकरी आपल्या मागण्यांवर अजूनही ठाम असून, केंद्र सरकारकडून या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे. आतापर्यंत चर्चेच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, केंद्र सरकारला कोणतंही यश आलेलं नाही. दरम्यान, चर्चेची सातवी फेरी आज सुरू झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना कृषी कायदे रद्द करणार की नाही? असा सवाल केला. त्यावर केंद्र सरकार कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यास तयार असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं. चर्चा याच मुद्द्यावर अडकल्याने जेवणासाठी बैठक थांबवण्यात आली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला