धमकीचे फोन खरे की जाणीवपूर्वक, याची चौकशी झाली पाहिजे : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई : काल मातोश्री तर आज सिल्व्हरओकवर शरद पवार (Sharad Pawar) तसेच गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) या तिघांनाही विदेशातून धमकीचे फोन आल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी शंका उपस्थित करून या फोनची नीट चौकशी झाली पाहीजे असे म्हटले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी या धमकीच्या फोनची एनआयए चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या धमकीच्या फोनची नीट चौकशी व्हायला हवी असे म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा:- मुख्यमंत्र्यांप्रमाणे शरद पवारांनाही धमकीचा फोन, संजय राऊतांनी घेतली भेट

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjya Raut) पून्हा माध्यमांसोमोर सतत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे गेल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेत नवा वाद सुरू झाला. कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मिर संबोधल्यानंतर कंगना विरुद्ध मुंबई, बॉलिवूड, शिवसेना असे चित्र ऊभे झाले. मुबईचा बाप काढण्यापर्यंत हे प्रकरण गेले. त्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र विरोध होत असताना पाहून कंगनाने नमती भूमिका घेत मुंबईला यशोदा माता संबोधले. त्यानंतर महारष्ट्र आवडतो असेही तीने म्हटले. कंगनाचा कांगावा शांत होत नाही तोच मातोश्रीला दुबईतून दाऊदच्या हस्तकाकडून धमकीचे फोन आल्याचे कळले. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या सिल्व्हरओकवर व गृहमंत्री अनिल देशमुख यांना विदेशातून धमकीचे फोन आल्याचे सांगण्यात येत आहेत. एकूणच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण या ना त्या धक्का देणा-या बाबींवरून ढवळून निघत आहे.

याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री, सिल्व्हरओक, गृहमंत्री यांना आलेल्या धमकीच्या फोनची कसून चौकशी व्हावी असे म्हटले आहे. तसेच, धमकीचे फोन खरे आहे की कोणी जाणीवपूर्वक करत आहेत, अशी शंका उपस्थित करून या फोनची नीट चौकशी झाली पाहीजे असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

“धमकीच्या फोनबाबत नीट चौकशी झाली पाहिजे. हे फोन खरे आहेत की कुणी जाणीवपूर्वक करत आहे, या सर्व गोष्टींचा कसून तपास करायला पाहीजे. ज्यांना धमकीचे फोन आले आहेत, त्यांची प्रशासनाने विशेषत: पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER