‘मिर्झापूर असो की महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात’; मनसेकडून शिवसेनेवर जहरी टीका

Maharashtra Today

मुंबई :- मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कार्पिओ आढळली होती, या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहेत, यात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे, यावेळी चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

सचिन वाझेंचं (Sachin Vaze) नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्कोर्पिओ मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि सचिन वाझे यांना अटक या प्रकरणाचे धागेदोरे एकमेकांशी जोडले जात आहेत. सचिन वाझे प्रकरणात खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत ठाकरे सरकारविरोधात (Thackeray Govt)गंभीर आरोप केले आहेत. भाजपाचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी देखील नैतिक जबाबदारी स्विकारुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. याचदरम्यान मनसेने (MNS)देखील अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात, अशी जहरी टीका संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली आहे.

 

 

ही बातमी पण वाचा : येत्या दोन-तीन दिवसांत राज्याच्या राजकारणातील मोठा स्फोट होणार; मनसेचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER