सरपंचाची निवड सदस्यांतूनच, भाजपचं डिपॉझिट जप्त होणार – कॉंग्रेस

महाविकास आघाडी जिथेही एकत्र येऊन निवडणूक लढवेल तिथे भाजपची अनामत रक्कम जप्त होईल

Hassan Kolhapur

मुंबई :- भाजपच्या काळात लोकनियुक्त सरपंच निवडण्याची पद्धत चुकीची होती. करायचंच असेल तर मग सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांची निवड लोकांमधूनच केली पाहिजे,असे मत कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले व सरपंचाची निवडण सदस्यातूनच करण्यात येणार आहे. त्याबाबत गोंधळ नको, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

मुश्रीफ म्हणाले, भाजप काळातील लोकनियुक्त सरपंच निवडला जात होता. ही पद्धत चुकीची आणि लोकशाही विरोधी होती. निवडच करायची तर मग पंतप्रधानांपासून ते सरपंचापर्यंत सर्वांचीच नियुक्त लोकांमधून व्हावी. एकट्या सरपंचाची कशाला? असा सवाल करतानाच फक्त ग्रामपंचायत आणि नगरपालिकेत हा प्रयोग राबवण्यात अर्थ नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मार्च महिन्यापासून अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. डिसेंबर अखेर 14 हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले आहेत. आता कोरोना (Corona) रुग्णांची संख्याही कमी होत आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे, असं मुश्रीफ म्हणाले.

भाजपचं डिपॉझिट जप्त होणार –

लोकांनी निवडून दिलेल्या सदस्यातून सरपंचाची निवड करण्यात येईल. निवडणुकीनंतर आरक्षण सोडत काढून सरपंच निवडला जाईल, असं सांगतानाच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) जिथेही एकत्र येऊन निवडणूक लढवेल तिथे भाजपची अनामत रक्कम जप्त होईल, असा दावाही त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : कोल्हापूर महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकुया : हसन मुश्रीफ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER