जिथे डबल इंजिनचे सरकार आहे ते विफल झाले : नवाब मलिक

Nawab Malik & Devendra Fadnavis

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसच्या (Congress) अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात कोरोनाच्या (Corona) ‘मुंबई मॉडेल’ची पोलखोल केली आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका केली आहे. ‘मुंबई मॉडेल’ पचत नसल्यानेच फडणवीस खोटी माहिती पसरवत आहेत, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

“कोरोनाच्या बाबतीत गंभीरतेने राज्य सरकार काम करत आहे. कोरोना पॉझिटिव्हचा आकडा किंवा मृतांचा आकडा लपवला नाही. जगभर महाराष्ट्राच्या कामाची लोक नोंद घेत आहेत. राज्यात ६ हजार २०० लॅब तयार करण्यात आल्या. जास्तीत जास्त RT-PCR टेस्ट करण्यात आल्या. ही सर्व माहिती उघडपणे जनतेसमोर ठेवली आहे. ‘मुंबई मॉडेल’ची चर्चा होत आहे. सुप्रीम कोर्ट असेल किंवा विविध कोर्ट असतील, नीती आयोगानेही महाराष्ट्राच्या कोरोनाविरुद्धच्या कामाची प्रशंसा केली, हेच विरोधी पक्षनेत्याला पचत नाही आहे.” अशी खोचक टीका त्यांनी केली. “गुजरातमध्ये ७१ दिवसांत ६१ हजार पॉझिटिव्ह केसेस लपवण्यात आल्या.

गोव्यात ऑक्सिजन मिळत नसल्याने रोज लोकांचा मृत्यू होत आहे. उत्तरप्रदेशमध्ये दोन हजार लोकांचे मृतदेह नदीमध्ये फेकण्यात आले. म्हणजेच जिथे दुहेरी इंजिन असलेले सरकार आहे ते अयशस्वी झाले आहे, असे दाखवून महाराष्ट्रातील चांगले काम पचत नाही. आघाडी सरकारला बदनाम करण्याचा उद्योगच यांनी सुरू केला आहे. फडणवीसांना चांगली कामे दिसत नसेल, तर मग इलाज करू शकत नाही. मात्र, महाराष्ट्रात चांगली कामे होत आहेत, ही सत्य परिस्थिती आहे.” असेही नवाब मलिक म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button